Ganesh Chaturthi 2024 : गणेशाची स्थापना करताना 'या' दिशेला करा; जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?
Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीचा उत्सव 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी गणपतीची स्थापना करुन विधीवत पूजा केली जाते.
Ganesh Chaturthi 2024 : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्सव साजरा केला जातो. यावर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी गणपतीची स्थापना करुन विधीवत पूजा केली जाते. असं म्हणतात यामुळे सौभाग्यात चांगली वृद्धी होते.
गणेश चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat)
हिंदू पंचांगानुसार, शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 31 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, पुढच्या दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी ही पूजा संपन्न होणार आहे. प्रदोष काळात होणाऱ्या पूजेला सोडून सर्व व्रत उत्सवाच्या दिवशी उदय तिथीनुसार केले जातात. यासाठीच गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.
गणपतीची स्थापना करताना व्रत आणि उपवास ठेवला जातो. गणेश चतुर्थीचा दिवस देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर, घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.
कोणत्या दिशेला बाप्पाची स्थापना करावी?
वास्तूशास्त्रानुसार, गणपतीची मूर्तीला तुम्ही घराच्या ईशान्य कोणाला अर्थात उत्तर-पूर्व दिशेला स्थापित करावी. जर, ईशान्य दिशेला रिक्त जागा उपलब्ध नसेल तर गणपतीची मूर्ती तुम्ही पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला स्थापित करू शकता.
गणपतीची मूर्ती घरी आणताना 'ही' काळजी घ्या
यंदा गणेशोत्सवाला जर तुम्ही तुमच्या घरी बाप्पाची मूर्ती विराजमान करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
1. गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीबरोबर गणपतीच्या हातात मोदक आणि गणतीचं वाहन उंदीरमामा असावा. कारण गणपतीला मोदक फार प्रिय आहेत.
2. गणपतीची बैठ्या स्थितीतली मूर्ती घरी आणणं सर्वात शुभ मानलं जातं.
मान्यतेनुसार, अशी मूर्ती घरात आणल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या सौभाग्यात चांगली वाढ होते. सर्व कार्यांमध्ये यश मिळते. तसेच, घरात सुख-शांती टिकून राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Ganesh 2024 : 10, 20 नाही तर तब्बल 100 वर्षांनी गणेश चतुर्थीला जुळून येणार अद्भूत संयोग; 'या' 3 राशींना बाप्पा देणार कष्टाचं फळ