एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2024 : लाडक्या बाप्पाला दाखवा 'या' 5 पदार्थांचा नैवेद्य; घरावर राहील विशेष कृपा, धनात होईल अपार वाढ

Ganesh Chaturthi 2024 Prasad : गणपती बाप्पाला गोड पदार्थ खूप आवडतात. बाप्पाला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने धनलभ तर होतोच, शिवाय घरात सुख-समृद्धी देखील नांदते.

Ganesh Chaturthi 2024 : राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. या काळात बाप्पाची पूजा करण्यासोबतच त्याला नैवेद्य देखील दाखवला जातो.  कोणत्याही देवाची पूजा तेव्हाच पूर्ण मानली जाते जेव्हा त्याला नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पाची पूजा करताना त्याला नैवेद्य दाखवणं फार महत्त्वाचं आहे. 

गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण या व्यतिरिक्तही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या बाप्पाला खूप आवडतात. मोदकासोबत तुम्ही हे पदार्थही गणपतीला अर्पण करू शकता, यामुळे बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.

मोतीचूर लाडू :

गणपतीला मोतीचूर लाडू खूप आवडतात. असं मानलं जातं की, मोतीचूर लाडू अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि बाप्पााच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.

खीर :

तुम्ही गणपतीला खीरही अर्पण करू शकता. असं केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल आणि तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मोदक :

गणपतीला मोदक आवडतात हे सर्वांनाच माहित आहे. एकदा युद्धात गणेशजींचा दात तुटल्यामुळे त्यांना काहीही खाणं शक्य नव्हतं. त्यानंतर आई पार्वतीने त्याच्यासाठी मोदक बनवले. तेव्हापासून गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहेत. असं म्हटलं जातं की, बाप्पाला मोदक अर्पण केल्याने व्यक्तीवर गणपतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

केळीचा नैवेद्य :

कोणत्याही पूजेत सर्व देवी-देवतांना केळी अर्पण केली जातात. गणपतीला केळी खूप आवडतात. केळी अर्पण केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.

नारळ :

गणपतीला नारळही अर्पण केला जातो. नारळाच्या माडाला कल्पवृक्ष असंही म्हणतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश कल्पवृक्षात राहतात, असं मानलं जातं. त्यामुळे या झाडाचं फळ म्हणजेच नारळ, हे सर्व देवांना अतिशय प्रिय आहे. नारळ गणेशाला अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो.

गणपतीला नैवेद्य दाखवताना या मंत्राचा जप करा

बाप्पाला नैवेद्य दाखवताना मंत्राचा जप केल्याने बाप्पा नैवेद्य लवकर स्वीकारतात.

त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये। गृहाण सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर ।।

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Ganeshotsav 2024 : यंदाचा गणेशोत्सव 4 राशींसाठी ठरणार खास; 7 सप्टेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Embed widget