Gajkesari Rajyog 2025 : 9 जानेवारीला जुळून येणार शक्तिशाली 'गजकेसरी राजयोग'; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु
Gajkesari Rajyog 2025 : येत्या 9 जानेवारीला रात्री 08 वाजून 46 मिनिटांनी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाी आधीच गुरु ग्रह बृहस्पती विराजमान आहे. त्यामुळे या ठिकाणी गुरु आणि चंद्राची युती होणार आहे.
Gajkesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये चंद्र (Moon) हा सर्वात जलद गतीने चालणारा ग्रह मानला जातो. कारण चंद्र ग्रह एका राशीत फक्त अडीच दिवसांपर्यंत स्थित असतो. त्यामुळेच चंद्राची कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती किंवा दृष्टी पडते. चंद्राची काही ग्रहांबरोबर युती फार शुभ मानली जाते.
त्यानुसार, येत्या 9 जानेवारी रोजी रात्री 08 वाजून 46 मिनिटांनी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाी आधीच गुरु ग्रह बृहस्पती विराजमान आहे. त्यामुळे या ठिकाणी गुरु आणि चंद्राची युती होणार आहे. यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण झाला आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, या राजयोगामुळे 12 राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे. पण, 3 राशींच्या लोकांचं भाग्य या काळात उजळू शकतं. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
या राशीच्या लग्न भावात गजकेसरी योगाची निर्मिती होतेय. त्यामुळे या राशीच्या लोकांना भरघोस यश मिळेल. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी देखील हा काळ फार चांगला ठरणार आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीत गजकेसरी योगाची निर्मिती सहाव्या चरणात होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शको. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, नोकरदार वर्गातील लोकांचं या काळात आपल्या कामावर पूर्ण लक्ष असेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच, तुमचं आरोग्यदेखील चांगलं राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला चांगला धनलाभ देखील होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :