Shukra Upay : शुक्रवारी रात्री कोणालाही न सांगता गुपचूप करा 'हा' उपाय; कुंडलीत शुक्राची स्थिती होईल मजबूत, चुंबकासारखा पैसा येईल धावून
Friday Remedies : शुक्रवारी रात्री गुप्तपणे केलेला हा उपाय व्यक्तीला धनवान बनवू शकतो. ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे माणसाचं नशीब एका रात्रीत उजळतं.
Shukrawar Upay : ज्योतिषशास्त्रात माणसाच्या प्रत्येक समस्येवर उपाय सांगितले आहेत. या उपायांमुळे ग्रहांशी संबंधित समस्याही सहज दूर होतात. व्यक्तीच्या कुंडलीतील शुक्र ग्रह त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगतो. शुक्र हा संपत्ती आणि भौतिक सुख-सुविधांचा स्वामी मानला जातो. शुक्राचा (Venus) आशीर्वाद कायम राहिला तर त्या व्यक्तीला कधीच कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत नाही.
याउलट जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र कमजोर असेल तर त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. शास्त्रानुसार, शुक्रवारी रात्री काही गुप्त उपाय केल्याने कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि नशिबाला कलाटणी मिळते. या उपायांमुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात, हे उपाय नेमके कोणते? जाणून घेऊया.
या उपायांमुळे आर्थिक समस्या होतील दूर
शास्त्रात नमूद केलेला हा उपाय गुपचुप करायचा आहे, यामुळे तुम्हाला वेळोवेळी आर्थिक लाभ मिळेल. यासाठी संपत्तीची देवी लक्ष्मीची सलग 21 शुक्रवार पूजा करावी. तसेच त्यांना खीर आणि गोड प्रसाद अर्पण करावा. पूजा पूर्ण झाल्यावर हा प्रसाद 9 वर्षांखालील मुलींना वाटून द्यावा. त्यानंतर प्रथम आपल्या घरातील ज्येष्ठ महिलेने तो ग्रहण करावा आणि नंतर तो संपूर्ण कुटुंबाने स्वीकारावा. यामुळे केवळ आर्थिक समस्याच सुटणार नाहीत, तर पैशाच्या प्रवाहाचे नवे मार्ग देखील खुले होतील.
पैशाशी संबंधित सर्व त्रास होतील दूर
दुसरा गुप्त उपाय म्हणजे शुक्रवारी संपूर्ण घर स्वच्छ करा. तसेच तुम्हाला या दिवशी उपवास करावा लागेल. या दिवशी लक्ष्मीची पूजा करावी. मंदिरात जाऊन 11 कमळाची फुलं अर्पण करा आणि नऊ वाती तुपाचा दिवा लावा. या दिवशी तुम्ही पांढरे वस्त्र देखील दान करू शकता. वाहत्या पाण्यात दोन मोती सोडा. या उपायाने व्यक्तीच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.
करिअरमध्ये प्रगतीसाठी
शुक्रवारी स्टीलचे कुलूप खरेदी करा. मग रात्री झोपण्यापूर्वी ते आपल्या जवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी शनिवारी हे कुलूप मंदिरात ठेवा. हे कुलूप कोणी उघडले की त्या व्यक्तीच्या नशिबाचे कुलूपही उघडेल. पण लक्षात ठेवा की हे कुलूप कधीही स्वतः उघडू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: