एक्स्प्लोर

Dussehra 2024 : दसऱ्याच्या दिवशी करा 'हे' 5 शक्तिशाली उपाय; दारिद्र्यातून मिळेल मुक्ती, साडेसातीही होईल दूर

Dussehra 2024 : हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला.

Dussehra 2024 : देशभरात नवरात्रीचा उत्सव अगदी आनंदात आणि उत्साहात सुरु आहे. नवरात्रीच्या (Navratri 2024) दशमीच्या दिवशी दसरा (Dussehra 2024) साजरा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, यंदा दसरा येत्या 12 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी साजरा केला जाणार आहे. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. 

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान रामाने रावण आणि देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला. त्यामुळे या तिथीला विजयादशमीच्या दिवशी साजरे केले जाते. असं म्हणतात की, दसऱ्याच्या शुभ दिवशी काही उपाय केल्यास वर्षभर त्याचा प्रभाव आपल्यावर राहतो. दसऱ्याच्या दिवशी रोग, पैशांची कमतरता, दारिद्र्य आणि कार्यात अडथळा आणि शनीची साडेसाती, ढैय्यासाठी काही उपाय तुम्ही करु शकता. 

रोगांपासून होईल सुटका 

दसऱ्याच्या दिवशी रोगांपासून मुक्ती हवी असल्यास सुंदरकांडचा पाठ करा. याशिवाय, एक नारळ हातात ठेवून हनुमान चालीसा "नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमान बीरा" वाचून रोगीच्या डोक्यावरून हात फिरवा. त्यानंतर नारळाला रावण दहनात फेकून द्या. यामुळे तुमचे आजार दूर होतील. 

हाती घेतलेल्या कार्यात मिळेल यश 

तुमच्या कार्यात यश किंवा कोणत्याही समस्येपासून सुटका हवी असल्यास दसऱ्याच्या दिवशी अपराजिताच्या रोपाची पूजा करा. हे फूल हातात बांधल्यास तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल असं म्हणतात. 

धन-लाभ होईल 

व्यवसायात प्रगती हवी असल्यास दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र , नारळ, मिठाई यांसारख्या वस्तू ब्राह्मणाला दान करा. यामुळे तुमच्या व्यवसायाला चांगली बरकत येईल. तसेच, तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. 

शनीच्या साडेसातीपासून होईल सुटका 

जर तुमच्या कुंडलीत शनीची साडेसाती  किंवा ढैय्या असेल तर त्यापासून सुटका हवी असल्यास दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली तीळाच्या तेलाने 11 दिवे लावा. आणि प्रार्थना करा. यामुळे शनीची ढैय्या आणि साडेसातीपासून सुटका होईल.

दारिद्र्य होईल दूर 

सर्वात मोठं दान हे गुप्त दान असतं असं म्हणतात. यासाठी दसऱ्याच्या दिवशी गुप्त पद्धतीने ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्रदान करा. यामुळे तुमचे दारिद्र्य दूर होईल. तसेच, घरात वातावरही प्रसन्न राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shardiya Navratri 2024 : आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: धनु, मकर राशी...खर्च सांभाळून करा! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आयुष्यात बदल होणार! आर्थिक, करिअर, संधी.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
धनु, मकर राशी...खर्च सांभाळून करा! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आयुष्यात बदल होणार! आर्थिक, करिअर, संधी.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका! तुळशी मातेला काय अर्पण करावे? काय टाळावे? धार्मिक मान्यता, परंपरा...
तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका! तुळशी मातेला काय अर्पण करावे? काय टाळावे? धार्मिक मान्यता, परंपरा...
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक राशींचा 25 नोव्हेंबरनंतर भाग्योदय? नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअर, संधी.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
तूळ, वृश्चिक राशींचा 25 नोव्हेंबरनंतर भाग्योदय? नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअर, संधी.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Shani Sade Sati: खूप सोसलं..अखेर 'या' एका राशीची शनि साडेसातीतून सुटका! आयुष्यात घडणार 'हे' 5 सकारात्मक बदल, पैसा, नोकरी, प्रेमात सुख, ज्योतिषशास्त्र...
खूप सोसलं..अखेर 'या' एका राशीची शनि साडेसातीतून सुटका! आयुष्यात घडणार 'हे' 5 सकारात्मक बदल, पैसा, नोकरी, प्रेमात सुख, ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Sanjay Raut: डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sinhgad Education Society Case : सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
Embed widget