Diwali 2024 : दिवाळीच्या दिवशी बुधाचा शनीच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नोकरी-व्यवसाय गाठणार वेगळी उंची
Mercury Transit 2024 : ग्रहांचा राजकुमार बुध दिवाळीनंतर शनीच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे, ज्याचा विलक्षण फायदा 3 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींना नोकरी-व्यवसायातून अपार धनलाभ होऊ शकतो.
Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वेळोवेळी ग्रह राशींप्रमाणे नक्षत्र देखील बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशासह जगावर दिसून येतो. शुक्रवारी, 1 नोव्हेंबरला ग्रहांचा राजकुमार बुध विशाखा नक्षत्रातून बाहेर पडून अनुराधा नक्षत्रात प्रवेश करेल. अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनिदेव (Shani Dev) आहे, जो कर्माचा स्वामी आणि न्यायाचा देव आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि आणि बुध हे एकमेकांचे मित्र मानले जातात. अशा स्थितीत बुधाच्या नक्षत्र बदलामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकते. तसेच, या राशींच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
बुधाचं नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. कारण बुध ग्रह तुमच्या राशीचा स्वामी आहे, तसेच त्याची शनिशी मैत्री आहे. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच तुमचं कौटुंबिक जीवन सुखकर होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, तुम्हाला शेअर बाजार, बेटिंग आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो. तुमची धार्मिक कार्यात रुची वाढेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. या काळात गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचं नक्षत्र बदल शुभ ठरू शकतं, कारण बुध ग्रह तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकतं. वित्त आणि गुंतवणुकीच्या बाबतीतही तुम्हाला लाभ मिळतील. तसेच, जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. तर नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. तुम्हाला प्रमोशनही मिळू शकतं. तुम्हाला स्टॉक मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्येही नफा मिळू शकतो. त्याचबरोबर व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.
तूळ रास (Libra)
बुधाचा नक्षत्र बदल तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. धैर्य आणि शौर्यही वाढेल. तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. यासोबतच तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यापार-उद्योग किंवा भागीदारीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कनिष्ठ आणि वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. या काळात तुम्ही कोणतीही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: