Dhanteras 2025 : सोनं-चांदी, भांडी खरेदी करा, पण धनत्रयोदशीला 'या' वस्तूंची खरेदी टाळा; वर्षभर होईल पश्चात्ताप
Dhanteras 2025 : धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Dhanteras 2025 : आनंदाचा आणि प्रकाशाचा असा दिवाळीचा (Diwali 2025) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीची सुरुवात साधारणपणे धनत्रयोदशीपासून (Dhanteras 2025) केली जाते. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार, यंदा 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी आणि पितळेच्या-तांब्याच्या वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. मान्यतेनुसार, या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमुळे घरात सुख-समृद्धी येते. तसेच, धन-संपत्तीत चांगली भरभराट. पण, या दिवशी काही वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
धनत्रयोदशी नेमकी कधी? (When Is Dhanteras 2025?)
हिंदू पंचांगानुसार, यंदा अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच 18 ऑक्टोबर 2025 रोजी शनिवारी दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त सुरु होईल. तर, 19 ऑक्टोबर 2025 रोजी रविवारी दुपारी 1 वाजून 51 वाजेपर्यंत ही शुभ तिथी असणार आहे. मात्र, 18 ऑक्टोबर रोजी शनिवार प्रदोष काळ असल्यामुळे या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाईल.
धनत्रयोदशीला 'या' वस्तू खरेदी करु नका
लोखंडाची भांडी
धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकदा लोक भांडी खरेदी करतात. या दरम्यान लोखंडाची भांडी चुकूनही खरेदी करु नका. या व्यतिरिक्त तुम्ही स्टील किंवा एल्युमिनियमची भांडीसुद्धा खरेदी करु नका.
काळ्या रंगाच्या वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू जसे की, बॅग, कपडे, बूट इ. वस्तूंची देखील खरेदी करणं अशुभ मानलं जातं.
काचेच्या वस्तू
असं म्हणतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी काचेच्या वस्तूदेखील खरेदी करु नयेत. या दिवशी काचेची भांडी किंवा सजावटीच्या वस्तूदेखील खरेदी करु नयेत.
खोट्या वस्तू
या दिवशी चाकू, कैची, सुईसह कोणत्याही वस्तूंची खरेदी करु नका.
आर्टिफिशियल ज्वेलरी
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं आणि चांदीपासून बनवलेल्या वस्तू शुभ मानल्या जातात. मात्र, या दिवशी आर्टिफिशियल ज्वेलरीची खरेदी करु नये.
प्लास्टिकच्या वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंची देखील खरेदी करणं अशुभ मानलं जातं. धनत्रयोदशीला सोनं, चांदीच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण, जर तुम्ही या वस्तूंची खरेदी केली तर ते अशुभतेचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे या वस्तूंची खरेदी करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :













