Datta Jayanti 2025 : यंदाची दत्त जयंती 3 राशींसाठी ठरणार खास; 4 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Datta Jayanti 2025 : दत्त जयंतीला शिव गौरी शुभ योग जुळून आला आहे. या संयोगामुळे 4 डिसेंबरपासून 3 राशींवर दत्ताची कृपा राहणार आहे.

Datta Jayanti 2025 : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला दत्तात्रेय जयंती (Datta Jayanti) साजरी केली जाते. यंदा दत्तात्रेय जयंतीला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. चंद्राने वृषभ राशीत प्रवेश केल्यामुळे आणि वृषभ राशीत गुरू देखील उपस्थित असल्यामुळे शिव गौरी शुभ योग निर्माण झाला आहे. चंद्र आणि गुरु यांच्या संयोगाने तयार झालेला शिव गौरी शुभ योग अत्यंत शुभ मानला जातो. त्यासोबत दत्त जयंतीला अमृत सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. या संयोगामुळे 4 डिसेंबरपासून 3 राशींवर दत्ताची कृपा राहणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी दत्त जयंतीला बनलेला गजकेसरी राजयोग भाग्याचा ठरेल. या काळात वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या आवडीचं काम करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होईल. या काळात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. विवाहित लोकांचे संबंध चांगले होतील आणि अविवाहित लोकांनाही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना यंदाची दत्त जयंती फलदायी ठरेल. या दिवस गजकेसरी राजयोग जुळून आल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुम्हाला पालक आणि शिक्षकांचं पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बोनस आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद वाढेल. या काळात व्यवसायात प्रगतीसोबतच काही नवीन काम सुरू करू शकता.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दत्त जयंतीपासूनचा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. या दिवशी बनलेला गजकेसरी योग तुम्हाला अनेक फायदे देईल. करिअरमध्ये यश आणि व्यवसायात फायदा होईल. कुटुंबात आनंद वाढेल. तुम्हाला जोडीदार आणि मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. यासोबतच मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची तब्येतही सुधारेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















