एक्स्प्लोर

Astrology : एप्रिलमध्ये 4 ग्रहांच्या युतीमुळे बनणार चतुर्ग्रही योग; वृषभसह 5 राशी ठरणार भाग्यवान, होणार चौफेर लाभ

April Lucky Zodiac Signs : एप्रिल महिन्यात शुक्र, बुध, मंगळ आणि राहू एकत्र आल्याने चतुर्ग्रही योग बनणार आहे. हे चारही ग्रह एकत्र मेष राशीत एकत्र येणार आहेत, त्यामुळे हा काळा 5 राशींसाठी भाग्याचा ठरेल. परंतु या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया

Lucky Zodiac Signs For April : एप्रिल महिन्यात मीन राशीत चतुर्ग्रही योग बनणार आहे. शुक्र, बुध, मंगळ आणि राहू एकत्र आल्याने या योगाची निर्मिती होईल. यावेळी मंगळ आणि राहूचा संयोग प्रतिकूल असला, तरी शुक्र आणि बुध यांचा संयोग अतिशय शुभ ठरणार आहे. अशा स्थितीत, 5 राशींना एप्रिल महिन्यात सर्वांगीण लाभ होईल. संपत्ती, प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होतील. वृषभ राशीसह पाच राशीच्या (Zodiac Signs) लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळतील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या

वृषभ महिना (Taurus)

एप्रिल महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरेल. तुम्हाला या महिन्यात करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ होऊ शकतो. हितचिंतकांच्या सहाय्याने उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. एखाद्या व्यक्तीच्या मदतीने आर्थिक लाभ होईल. तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल. या महिन्यात तुम्हाला कामानिमित्त अनेकदा प्रवास करावा लागू शकतो. एखादं प्रलंबित काम पूर्ण झाल्याने तुम्हाला हलकं वाटेल. या महिन्यात तुम्ही सर्व आव्हानांना धैर्याने सामोरे जाल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना शुभ ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांकडून मदत मिळेल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात अधिक रस असेल. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळेल. या महिन्यात तुम्ही कोणताही प्रवास कराल तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. एप्रिल महिना तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. या महिन्यात तुमचं कौटुंबिक जीवन खूप आनंदी असणार आहे. तुमचे जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना खूप लाभदायक असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. कामावर सर्व सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये, निर्णय तुमच्या बाजूने होईल. महिन्याच्या मध्यात तुम्हाला अशी कोणी व्यक्ती भेटेल जी तुमची सर्व चिंता दूर करेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून मोठं सरप्राईज मिळू शकतं. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना यशाचा असेल. परंतु, महिन्याच्या मध्यात तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण तरू तुम्ही सर्व गोष्टी सहजपणे हाताळू शकता. या काळात तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असणार आहे. परंतु, तुमचं उत्पन्न तुमच्या खर्चाप्रमाणे तसं चांगलं राहील. तुमच्या लव्ह लाईफच्या दृष्टीने हा महिना खूप चांगला असणार आहे. कुटुंबात आनंदाचं आणि हास्याचं वातावरण असेल. परंतु, महिन्याच्या शेवटी थोडं सावध राहावं लागेल, तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना खूप शुभ असणार आहे. तुम्ही या महिन्यात भरपूर मेहनत कराल. जर तुम्ही तुमचं करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. नोकरदार लोकांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याची संधी मिळेल. या महिन्यात तुमच्याकडे उत्पन्नाचे विविध स्रोत असतील. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला तुमचे पैसे या महिन्यात परत मिळू शकतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Budh Vakri 2024 : बुध ग्रह मेष राशीत होणार वक्री; 'या' 3 राशींसोबत घडणार भलत्याच घडामोडी, हातातून पैसाही निसटणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!NEET Exam Scam : 'माझा'च्या प्रतिनिधीला 'नीट'चा आरोपी गंगाधरक़डून धमकावण्याचा प्रयत्नMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Embed widget