Chandra Grahan 2025 : शनिच्या राशीत लागणार वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण; 7 सप्टेंबरपासून 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य, नशिबाचे दार उघडणार
Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ लागणार आहे. यामुळेच 7 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वाजून 57 मिनिटांनी सूतक काळ लागणार आहे.

Chandra Grahan 2025 : वैदिक शास्त्रानुसार, येत्या 7 सप्टेंबर 2025 रोजी वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातसुद्धा दिसणार आहे. हे चंद्रग्रहण रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी, तसेच, रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी आणि रात्री 1 वाजून 57 मिनिटांनी संपणार आहे. चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ लागणार आहे. यामुळेच 7 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वाजून 57 मिनिटांनी सूतक काळ लागणार आहे. हे चंद्रग्रहण शनीच्या (Shani Dev) कुंभ राशीत लागणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी हा काळ फार भाग्याचा असणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात येणारे वाद हळुहळू मिटतील. चंद्रग्रहणाच्या प्रभावाने तुमच्या सुख संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. या काळात घाईगडबडीत पैसे खर्च करु नका.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी चंद्रग्रहणाचा काळ फार शुभकारक असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, करिअरमध्ये तुम्हाला मनाप्रमाणे लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी हा काळ चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, शनिदेवाच्या कृपेने तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. नशिबाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सहज पूर्ण होऊ शकतील.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















