Chanakya Niti : मानवाची 'ही' एकच गोष्ट प्राण्यांपासून वेगळी करते, ती गमावणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा, आचार्य सांगतात...
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या 17 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकमध्ये उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याने हा गुण कधीच गमावता कामा नये अन्यथा तुमचं जीवन व्यर्थ आहे.
Chanakya Niti : चाणक्य नीतिमध्ये आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनाचं मूल्य सांगितलं आहे. व्यक्तीला यशस्वी होणयासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व चाणक्य नीतिमध्ये मांडण्यात आल्या आहे. चाणक्य सांगतात, माणूस आणि प्राण्यांमध्ये अनेक गुण समान आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितलं आहे की, माणूस आणि प्राण्यांमध्ये चार गुण समान आहेत. पण, असा एक गुण आहे जो मनुष्याला प्राण्यांपासून वेगळं सिद्ध करतो.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या 17 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकमध्ये उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याने हा गुण कधीच गमावता कामा नये अन्यथा तुमचं जीवन व्यर्थ आहे.
आहारनिद्राभयमैथुनानिसमानि
चैतानि नृणां पशूनाम्
ज्ञानं नराणामधिको विशेषो
ज्ञानेन हीनाः पशुभिः समानाः
1. चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, मनुष्य आणि प्राणी या दोघांची सर्वात महत्त्वाची गरज असते ती पुरेशी झोप घेणे. ज्या प्रमाणे मानवाला रोज झोपेची नितांत गरज असते तशी प्राण्यालाही झोपेची गरज असते. चांगली झोप घेतल्याने मानवाला ऊर्जावान राहण्यास मदत करते. झोप पूर्ण झाली की माणूस काम करण्यास उत्साही असतो. तर, जर माणसाला अशक्तपणा किंवा आळस आला तर माणूस आपलं ध्येय साध्य करण्यात अपयशी होतो. म्हणून माणवाला पुरेशी झोप गरजेची आहे.
2. सृष्टीच्या प्रगतीसाठी माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येही लैंगिक संबंध आवश्यक आहेत. शेवटची गोष्ट म्हणजे भीती. मानवामध्ये भीतीची भावना नैसर्गिक आहे. भीती हा एक मानसिक विकार आहे. अनेक प्रकारच्या भीती माणसांना सतावतात, त्याचप्रमाणे प्राण्यांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी भीती वाटणं स्वाभाविक आहे.
3. ज्ञान हा असा एक गुण आहे जो मानवाला प्राण्यांपेक्षा वेगळा बनवतो. बुद्धिमत्ता ही माणसाची सर्वोत्तम ओळख आहे. यामुळे तो संपत्ती आणि धर्माचा पाठपुरावा करू शकतो. बुद्धिमत्तेच्या जोरावरच जीवनात यश मिळते. चाणक्य म्हणतात की, मानव हा ज्ञान नसलेल्या प्राण्यांसारखा आहे. म्हणजे जो माणूस आपले ज्ञान वाढवत नाही किंवा आपल्या ज्ञानाचा उपयोग करत नाही तो जनावरासारखा असतो. चाणक्य म्हणतात की, ज्ञान मिळेल तेथून मिळवावे. ज्ञानाच्या मदतीने प्रत्येक अडचणींवर मात करता येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :