Mercury Transit: बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे वाढणार अडचणी; 'या' राशींचा वाईट काळ सुरु होण्याची शक्यता
Mercury Transit : बुधदेव 7 मार्चला सकाळी 9 वाजून 21 मिनिटानी मीन राशीत प्रवेश करणार आहेत. त्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल.
Mercury Transit : ज्योतिषशास्त्रातील बुध (Mercury Transit) हा एक महत्त्वपूर्ण ग्रह आहे. बुध हा चंद्रानंतर सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार असेही म्हटले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, पैसा, व्यवसाय, संवाद, वाणी आणि करिअरचा कारक मानला जातो. बुधदेव 7 मार्चला सकाळी 9 वाजून 21 मिनिटानी मीन राशीत प्रवेश करणार आहेत. त्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल. परंतु काही राशी अशा आहेत ज्यांना बुधदेवाच्या राशी परिवर्तनाने चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. त्यांना आयुष्यात अपार सुख, समृध्दी आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे. तर काही राशींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
मेष (Aries Horoscope)
मीन राशीतील बुधाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी चांगले होणार नाही. यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. करिअरमध्ये काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कार्यालयात सहकाऱ्यांसोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे पण प्रवासात तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचा खर्च खूप वाढू शकतो. मेष राशीच्या लोकांचे आरोग्यही यावेळी बिघडू शकते.
मिथुन (Gemini Horoscope)
बुधाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी अशुभ परिणाम घेऊन येत आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. या राशीच्या लोकांवर कामाचा ताण लक्षणीय वाढू शकतो. तुमच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. कामात समाधान वाटणार नाही. यावेळी तुम्हाला स्वतःमध्ये अनेक कमतरता दिसतील. ऑफिसमध्ये तुम्ही कोणतेही काम कराल, तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. तुम्हाला व्यवसायातही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो
तूळ (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण चांगले परिणाम देणारे नाही. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीतून यश मिळणार नाही. तुमच्या सर्व इच्छा अपूर्ण राहतील. यावेळी केलेल्या सर्व योजना अयशस्वी होतील. यशाच्या मार्गावर तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. तूळ राशीच्या लोकांना यावेळी नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागू शकतो. आर्थिकदृष्ट्याही हे संक्रमण तुमच्या अडचणी वाढवणारे ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :