Chanakya Niti : एकवेळ गोष्टी मनात ठेवा, पण 'या' 5 लोकांबरोबर कधीच दु:ख शेअर करु नका; चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : असं म्हणतात की, काही लोकांबरोबर दु:ख शेअर केल्याने आपली संकटं आणि अडचणी दुप्पट पटीने वाढतात.
Chanakya Niti : असं म्हणतात की एखाद्याशी आपलं दु:ख शेअर केल्याने आपलं दु:ख कमी होतं. आणि एखाद्याशी आपला आनंद शेअर केल्याने आपल्या आनंदात भर पडते. पण, आचार्य चाणक्यांच्या (Chanakya Niti) मते, आपल्या आयुष्यात असे काही दु:ख आहेत जी कधीच कोणाबरोबरच शेअर करु नयेत.
असं म्हणतात की, काही लोकांबरोबर दु:ख शेअर केल्याने आपली संकटं आणि अडचणी दुप्पट पटीने वाढतात. यासाठीच कोणत्या लोकांबरोबर आपलं दु:ख करु नये हे जाणून घेऊयात.
1. जे सर्वांचेच मित्र असतात
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, जे लोक प्रत्येकाला आपला मित्र मानतात अशा लोकांबरोबर कधीच आपलं दु:ख शेअर करु नका. असे लोक वेळ आल्यावर तुमचं दु:ख इतरांशी शेअर करु शकतात. यासाठीज जे खोटी मैज्ञी करतात अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये तसेच, त्यांच्याशी कधीच दु:ख शेअर करु नये.
2. प्रत्येक गोष्टीची चेष्टा करणारे लोक
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जे तुमच्या म्हणणं ऐकून घेत नसतील, सतत चेष्टा करत असतील अशा लोकांवर चुकूनही विश्वास ठेवू नका. हे लोक दुसऱ्यांची चेष्टा करण्यात पटाईत असतात. तसेच, हे फार मतलबी असतात.
3. स्वार्थी लोक
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, कधीही स्वार्थी लोकांबरोबर आपलं दु:ख शेअर करु नका. अशा लोकांना दुसऱ्यांना दु:ख द्यायला आवडतं. असं म्हणतात की, स्वार्थी लोक दुसऱ्यांच्या दुखाला फार कमी लेखतात.
4. इतरांवर रागावणारे लोक
चाणक्य नितीत म्हटल्याप्रमाणे, जे लोक इतरांवर जळतात किंवा चिडतात अशा लोकांना आपलं दु:ख कधीच शेअर करु नये. चाणक्य म्हणतात की, असे लोक वेळ आल्यावर आपलं वर्तन बदलतात. तसेच, इतरांसमोर आपल्या म्हणण्याची चेष्टा करतात.
5. विचार न करता बोलणारे लोक
अनेकदा आपण पाहिलं असेल की, खूप बोलके असणारे लोक कधीही काहीही बोलून मोकळे होतात. आणि नंतर त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होतो. यासाठीच कधीही विचार न करता कोणाशीही आपलं म्हणणं शेअर करु नका. कारण हे लोक कोणासमोरही तुमची गोष्ट शेअर करु शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :