Chanakya Niti : कितीही जवळचा मित्र असला तरी 'या' 5 गोष्टी कोणाशीही शेअर करु नका, अन्यथा...आयुष्यभरासाठी होईल पश्चाताप
Chanakya Niti : चाणाक्य नितीचा वापर वर्तमानातही केला जातो. अनेकदा आपण बोलण्यात इतके व्यस्त होऊन जातो की, बोलण्याच्या नादात कोणत्या गोष्टी बोलाव्यात आणि कोणत्या बोलू नयेत हे आपण विसरतो.

Chanakya Niti : चाणाक्य नितीमध्ये जीवनातील यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी अनेक अमूल्य गोष्टी सांगितल्या आहेत. चाणाक्य नितीचा वापर वर्तमानातही केला जातो. अनेकदा आपण बोलण्यात इतके व्यस्त होऊन जातो की, बोलण्याच्या नादात कोणत्या गोष्टी बोलाव्यात आणि कोणत्या बोलू नयेत हे आपण विसरतो. नंतर याच गोष्टी आठवून पश्चात्ताप होतो.
अशा वेळी आचार्य चाणाक्य यांनी व्यक्तीने जीवनात काही गोष्टी अशा आहेत ज्या कधीच कोणाशीही शेअर करु नयेत. या 5 गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कुटुंबातील गोष्टी
अनेकदा आपण बोलताना आपल्या घरातल्या गोष्टी मित्रांना, नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना सांगतो. मात्र, याच गोष्टीचा नंतर पश्चात्ताप होतो. घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्याने घरातील सदस्यांबद्दल आपल्या मनात दुरावा निर्माण होतो. तसेच, विश्वास कमी होतो. नवरा-बायकोमधील संबंध कधीच कोणाशी शेअर करु नयेत. यामुळे तुमची कमजोरी इतरांना दिसते.
तुमच्या पगाराविषयी कोणाला सांगू नका
लोकांना अनेकदा तुमचा पगार जाणून घेण्याची फार इच्छा असते. अशा वेळी जर तुम्ही त्यांना तुमचा पगार सांगितला तर सर्वात आधी तुमच्याकडे ते त्यांच्या गरजेच्या वेळी पैसे मागतील.
जर तुम्ही त्यांना पैसे देऊ शकला नाहीत तर तुमच्यात मतभेद निर्माण होतील. आणि जर तुमचा पगार कमी असेल तर लोक तुमची चेष्टा करतील.
तुमच्या भूतकाळातील चुका
तुमच्या भूतकाळातील चुकांचा पाढा कधीच कोणासमोर वाचू दाखवू नका. यामुळे तुमची नकारात्मक बाजू इतरांसमोर येईल. आणि लोक तुमच्याकडे त्याच नजरेने पाहतील. तसेच, भविष्यातील योजना देखील कोणाशी शेअर करु नका. अन्यथा लोक तुमची चेष्टा उडवतील.
तुमच्या अपमानीत गोष्टी
जर तुमचा सातत्याने अपमान होत आला असेल तर त्याचा आणखी प्रचार करु नका. कोणाचाही अपमान सहन करु नका. त्याला प्रतिउत्तर द्या. जर तुम्ही त्याचा वारंवार उल्लेख केलात तर लोक तुमची चेष्टा करतील.
मनातील गोष्टी
आपल्या मनात अनेक भावना येतात. जसे की, राग, निराशा, ईर्ष्या, भीती. मात्र, मनातील प्रत्येक गोष्ट व्यक्त करणं चुकीचं आहे. ज्या गोष्टी तुमच्या तुमच्या हितात आहेत त्याच सांगाव्यात.
हेही वाचा:
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















