Astrology : प्रसाद नेहमी उजव्या हातातच का दिला जातो? डावा हात खरंच अशुभ असतो? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार...
Astrology : प्रसाद नेहमी उजव्या हातातच का घेतला जातो? डाव्या हातात का नाही? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

Astrology : हिंदू सनातन धर्मात अनेक रिती परंपरा पाळल्या जातात. ज्या फार पूर्वीपासून अत्यंत परंपरेने आणि निष्ठेने चालत आलेल्या आहेत. आजही आपण या परंपरा फॉलो करतो. यामधलाच एक नियम म्हणजेच, मंदिरात जाताना जेव्हा आपण प्रसाद हातात घेतो. तेव्हा तो प्रसाद नेहमी उजव्या हातातच घेतो. मात्र, हा प्रसाद नेहमी उजव्या हातातच का घेतला जातो? डाव्या हातात का नाही? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
उजव्या हाताचं महत्त्व नेमकं काय?
धार्मिक मान्यतेनुसार, आपला उजवा हात फार ऊर्जा प्रवाहित करतो. या हाताला शुभ ऊर्जा आणि सूर्याचं प्रतीक देखील मानलं जातं. तर, डावा हाथ हा चंद्राशी संबंधित आहे. यामुळेच, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना हातात प्रसाद ठेवला जातो. आणि म्हणूनच तो नेहमी उगवत्या दिशेने म्हणजेच सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि ऊर्जा प्रवाहित करणारा असावा यामुळेच प्रसाद उजव्या हातात घेतला जातो. यामुळे देवाचा आशीर्वाद तुम्हाला लाभतो. आणि तुमची कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतात.
डावा हात अशुभ असतो?
ज्योतिष शास्त्रानुसार, आपण अनेक महत्त्वाची कामं डाव्या हाताने करतो. त्यामुळे दोन्ही हात खरंतर महत्त्वाचे आहेत. मात्र, धार्मिक मान्यतेनुसार, डाव्या हाताने प्रसाद हातात घेणं फार अशुभ मानलं जातं. कारण या हाताने शुभ ऊर्जा प्रवाहित होत असते.
प्रसाद कसा ग्रहण करावा?
धार्मिक मान्यतेनुसार, तुम्ही जेव्हा प्रसाद ग्रहण कराल तेव्हा तो उजव्या हातातच घ्यावा. तसेच, प्रसाद,हातात घेण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. तसेच, त्यानंतर दोन्ही हात जोडून देवाचा आशीर्वाद घ्या. आणि समोर आलेल्या शुभ दिवसाबद्दल देवाचे आभार माना. आणि त्यानंतर प्रसाद घेऊन तो ग्रहण करावा.
हेही वाचा:
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















