Chanakya Niti : आयुष्यात तुम्ही कितीही मोठी चूक करा, पण बायकोच्या 'या' गोष्टी मरेपर्यंत कधी कोणाला सांगू नका; चाणक्य म्हणतात...
Chanakya Niti For Happy Life : चाणक्यांच्या म्हणण्याप्रमाणे, आपल्या जीवनातील काही गोष्टी या चुकूनही कधी कोणाला सांगू नये, अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करत बसावं लागेल. विशेषत: पत्नी संबंधित या 4 गोष्टी कोणालाही सांगू नका, नाहीतर आयुष्य उद्धवस्त होईल आणि तुम्हाला रडत बसावं लागेल.
![Chanakya Niti : आयुष्यात तुम्ही कितीही मोठी चूक करा, पण बायकोच्या 'या' गोष्टी मरेपर्यंत कधी कोणाला सांगू नका; चाणक्य म्हणतात... Chanakya Niti For Husband never share your wifes these 4 things to others Chanakya tips marathi news Chanakya Niti : आयुष्यात तुम्ही कितीही मोठी चूक करा, पण बायकोच्या 'या' गोष्टी मरेपर्यंत कधी कोणाला सांगू नका; चाणक्य म्हणतात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/cb54de29b0e85a44f937853be0c9dd0f1719989636133713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chanakya Niti : आपण आपल्या जीवनातील काही गुप्त गोष्टी कधीही इतर कोणाशी शेअर करू नये, अन्यथा ती व्यक्ती भविष्यात त्याचा गैरवापर करू शकते आणि आपल्याला फसवू शकते. चाणक्य नितीत (Chanakya Niti) जीवनाशी संबंधित अशा बऱ्याच नियमांचा उलगडा करण्यात आला आहे. व्यक्तीने त्याच्या जीवनातील गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नये, नाहीतर आपण एखाद्या मोठ्या संकटात सापडू शकता.
आपल्या जीवनात दररोज काही ना काही घटना घडत असतात. कितीतरी अडचणींचा आणि संकटांचा सामवा आपल्याला करावा लागतो. आपल्या जीवनात असे कितीतरी रहस्य असतात, जे रहस्य राहिलेलीच चांगले असतात. चाणक्य नितीत आचार्य चाणक्यांनी अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपण दुसऱ्यांना सांगून स्वत:साठीच खड्डा खणून घेत असतो. भविष्यात आपल्याला या गोष्टींचा खूप त्रास सहन करावा लागू शकतो. अशा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या इतरांना कधीच सांगू नये? जाणून घेऊया
पती-पत्नीतील संबंध
पती-पत्नीतील संबंध ही खूप खाजगी गोष्ट आहे. पती-पत्नीतील संबंधांची चर्चा कधीही कोणाशीही करू नये. दोघांमधील संबंधांची कोणतीही गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला माहिती पडता कामा नये. पती-पत्नीतील खाजगी गोष्टी इतर कोणाला माहित पडणे हे अडचणीचे ठरू शकते, तर कधी-कधी लाजिरवाणेही ठरू शकते, म्हणून अशा गोष्टी कोणाशीही शेअर करू नये.
घरातील भांडणं आणि वाद
तसे तर प्रत्येकाच्या घरात थोडेफार वादविवाद होतच राहतात, कधीकधी ही भांडणं विकोपाला देखील जातात. काही व्यक्तींना आपल्या घरातील भांडणं इतरांसमोर मांडण्याची फार वाईट सवय असते, अशा व्यक्ती घरातील छोट्या-छोट्या गोष्टीही इतरांना सांगत बसतात. परंतु जेव्हा सर्व गोष्टी पूर्ववत होतात, तेव्हा या व्यक्ती आपल्या कुटुंबाची आणि कुटुंबातील सदस्यांची इतरांसमोर चेष्टा करत बसतात. म्हणून आपल्या घरातील भांडणं आणि वादविवाद कधीच कोणाला सांगू नये.
धनाची हानी
आजकाल ज्याच्याकडे पैसा आहे, त्यालाच सगळीकडे मानपान आहे. पैसा असेल तरच माणसाला विचारतात, जर पैसा नसेल तर आपल्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. जर आपल्याकडचा पैसा खर्च झाला किंवा आपली धनहानी झाली तर त्याची वाच्यता कोणाकडेही करू नये, नाहीतर आपला मानपान कमी होतो.
आपले वय
चाणक्य नितिनुसार, आपले वय हे कधीही कोणाला सांगू नये. आपलं वय जितकं गुप्त ठेवलं जाईल, तितकं चांगलं असतं. आपल्या वयाबद्दल माहिती मिळाल्यास आपले विरोधक त्याचा फायदा उचलू शकतात, म्हणून या गोष्टी चुकूनही कोणाशी शेअर करू नये, नाहीतर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करत, रडत बसावं लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)