(Source: ECI | ABP NEWS)
Chanakya Niti : ऑफिसमध्ये बॉसकडून कौतुकाची थाप हवीय? चाणक्यांचे 'हे' सल्ले आत्ताच फॉलो करा...
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांच्या नीतीने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर चाणक्य नीती भाष्य करतात.

Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे एक महान तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. राजकारणावर देखील त्यांचा चांगला अभ्यास होता. त्याचबरोबर त्यांनी समाजातील प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे. त्यांचे विचार आजही समाजात अनेकजण फॉलो करतात. आचार्य चाणक्य यांच्या नीतीने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर चाणक्य नीती भाष्य करतात. त्याचबरोबर चाणक्य यांनी कॉर्पोरेट लाईफमधील कर्मचाऱ्यांसाठी देखील खास गोष्टी सांगितल्या आहेत. त्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
लीडरशिप क्वालिटी
लीडरशिप क्वालिटीमध्ये फक्त प्रामाणिकपणा चालत नाही तर, त्याचबरोबर थोडासा सामंजस्यपणा, रणनितीसुद्धा गरजेची आहे. ऑफिसमध्ये मनमोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. मात्र, कधी, कसं आणि कोणासमोर बोलावं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सामंजस्याने काम करण्यातच खरी लीडरशिप क्वालिटी आहे.
संपूर्ण योजना आखा
आचार्य चाणक्य कोणतंही कार्य सुरु करण्याआधी त्याची योजना आखायचे. त्याचबरोबर, तुम्ही देखील कोणतंही काम सुरु करण्याआधी त्याची योजना आखा. ऑफिसमध्ये कोणतंही प्रोजेक्ट किंवा टास्क हातात घेण्याआधी ते का करणं गरजेचं आहे तसेच त्याचे परिणाम काय होऊ शकतात, त्यामध्ये खरंच यश मिळणार आहे का? हे समजून घ्या.
दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका
स्वत:चूक करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या अनुभवातून शिका. ऑफिसमध्ये जर दुसऱ्यांच्या चुकांमधून आपण शिकत गेलो तर आपल्याकडून ती चूक घडत नाही. आपण ती चूक करण्यापासून सावध होतो.
स्वत:ला स्ट्रॉंग दाखवा
ऑफिसमध्ये काम करत असताना कधीच स्वत:ला इतरांपेक्षा कमी लेखू नका. तर तुमची स्ट्रॉंग बाजू दाखवा. ऑफिसमध्ये जर तुम्ही अशी छबी निर्माण केली तर कोणी तुम्हाला हलक्यात घेणार नाही.
चांगला व्यवहार करा
ऑफिसमध्ये विश्वास आणि आदर हवा असल्यास नेहमीच प्रमाणिकपणा आणि चांगला व्यवहार करा. जेव्हा तुम्ही योग्य काम करता, वेळेत काम पूर्ण करता आणि इतरांबरोबर वाईट करत नाहीत तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. यामुळे ऑफिसमधील वातावरण देखील प्रसन्न राहतं.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















