Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत चुकूनही 'या' 5 गोष्टी घरी आणू नका; देवी होईल नाराज
Chaitra Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसांत भाविक भक्तीभावाने मातेच्या पूजेत तल्लीन राहतात. या काळात काही खास गोष्टीही लक्षात ठेवाव्या लागतात.
Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri) सुरुवात झाली आहे. आज चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या संपूर्ण नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा उत्सव दरवर्षी चार वेळा येत असला तरी चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्री यांचं विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसांत भाविक देवीची भक्तीभावाने पूजा करतात. पूजेत तल्लीन राहतात. हे दिवस अत्यंत उत्साही आणि भक्तीभावाचे असले तरी या काळात काही खास गोष्टीही लक्षात ठेवाव्या लागतात. जसे की, एखाद्याने विधीनुसार पूजा केली पाहिजे, देवी मातेला नाराज करणारी कोणतीही वस्तू घरी आणू नये. अशा परिस्थितीत अशा काही वस्तू आहेत ज्या चैत्र नवरात्रीच्या काळात तुम्ही चुकूनही घरी आणू नयेत. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात.
9 एप्रिल ते 17 एप्रिल
9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली असून 17 एप्रिलला हा उत्सव संपेल. या वेळी भक्तांना पूजा करून माता राणीला प्रसन्न करायचे असते. नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी माँ सिद्धिदात्रीची पूजा मोठ्या थाटामाटात केली जाते.
चुकूनही 'या' गोष्टी आणू नका
नवरात्रीच्या काळात लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नका किंवा घरी आणू नका. असे मानले जाते की, नवरात्रीमध्ये लोखंडी वस्तू घरी आणल्याने आर्थिक समस्या वाढतात. नवरात्रीत काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नयेत. हे अशुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे देखील टाळावे. अन्यथा तुम्हाला ग्रह दोषांचा सामना करावा लागू शकतो. बूट आणि चप्पल देखील खरेदी करू नका. या काळात तांदूळ खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते. नवरात्रीच्या काळात उल्लेख केलेल्या वस्तूंची खरेदी केल्यास तुम्हाला पुण्य लागणार नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे चैत्र नवरात्रीच्या या काळात भाविकांनी चुकूनही या वस्तूंची खरेदी करू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: