एक्स्प्लोर

Capricorn Weekly Horoscope : पुढचे 7 दिवस धन-संपत्तीत होणार अपार वाढ, घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर ठाम राहा; मकर राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

Capricorn Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Capricorn Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : राशीभविष्यानुसार, मकर राशीचा नवीन आठवडा चढ-उतारांचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही मोठ्यातली मोठी समस्या हार न मानता सोडवली पाहिजे. वैयक्तिक प्रगतीसह नोकरी-व्यवसायाकडे देखील जबाबदारीने पाहिलं पाहिजे. तुमच्यातील कला जोपासा. प्रियकराशी वाद टाळावे लागतील. एकूणच मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)

या आठवड्यात तुमची अनेक नव्या लोकांशी ओळख होईल. पण, या ओळखीचं लगेच प्रेमात रूपांतर होऊ देऊ नका. कोणत्याही नात्यात गुंतण्याआधी 100 वेळा विचार करा. तसेच, तुमच्या मित्रांचा, कुटुंबियांचा देखील सल्ला घ्या. तसेच, जे तरूण लग्न करू इच्छितात त्यांना लवकरच नातेवाईकांच्या ओळखीतून शुभवार्ता मिळू शकते. तुम्हाला लग्नाचे अनेक प्रस्ताव येऊ शकतात. 

मकर राशीचे करिअर (Capricorn Career  Horoscope)

हा आठवडा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा तसेच आव्हानात्मक असणार आहे. कारण, तुमच्या नकळत अनेक समस्या एकामागोमाग येतील. तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध चांगले ठेवा. त्यातून कदाचित तुमचे प्रश्न सुटू शकतात. 

मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)

या आठवड्यात मकर राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पैशांचं व्यवस्थापन नीट करायला शिका. तुमचे पैसे कधी, कुठे, कसे खर्च होतायत याचा वेळोवेळी पाठपुरावा घेत चला. तसेच, पैशांची बचत करायला शिका. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच, ज्या लोकांनी कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा. 

मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)

या आठवड्यात तुम्ही तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला जे काही आजार जाणवत आहेत त्यांच्या लक्षणांकडे लक्ष द्या. संतुलित आहाराचं सेवन करा. नियमित व्यायाम करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Surya Gochar 2024 : लवकरच जुळून येतोय अतिशय शुभ योग; अनेक मार्गातून येणार पैसा, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

     

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 : 18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
Navratri Chinnamasta Devi 2026 : डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget