(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Capricorn Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : मकर राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे! नवीन आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : मकर राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कोणत्या चांगल्या बातम्या मिळणार आणि तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागणार? जाणून घेऊया.
Capricorn Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातील पहिला आठवडा संपत आला आहे. लवकरच नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा नवीन आठवडा मकर राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मकर राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मकर राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Life Horoscope)
नवीन आठवड्यात काही वाईट गोष्टी तुमचं रोमँटिक लाईफ खराब करतील. या आठवड्यात सर्व समस्यांचा सामना करा. या आठवड्याच्या शेवटी तुम्ही लव्ह लाईफमधील सर्व समस्या सोडवाल. तुमच्या जोडीदाराशी उद्धटपणे बोलू नका, यामुळे प्रियकर नाराज होऊ शकतो. विवाहित जोडप्यांसाठी ऑफिस रोमान्स चांगला नाही, यामुळे तुमचं कौटुंबिक जीवन धोक्यात येईल.
मकर राशीचे करिअर (Capricorn Career Horoscope)
या काळात तुम्हाला कर्मावर विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला व्यवसायात यश मिळेल. नोकरी करणारे मीटिंगमध्ये अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जे लोक वकील आहेत, मीडियामध्ये काम करतात त्यांचं शेड्युल बिझी असेल, कामानिमित्त प्रवास होऊ शकतो.या लोकांना प्रमोशन देखील मिळू शकतं. जे मुलाखतीच्या कॉलची वाट पाहत आहेत त्यांना या आठवड्यात ऑफर लेटर देखील मिळू शकतं.
मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)
आठवड्याच्या सुरुवातील पैशांशी संबंधित समस्या असतील, परंतु त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होणार नाही. जुन्या गुंतवणुकीतून या आठवड्यात चांगला परतावा मिळेल. तुमच्याकडे असलेल्या जुन्या देयकांची परतफेड करण्यासाठी पैसे हुशारीने वापरा. व्यावसायिकांना नफा होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी आठवड्याचा शेवट चांगला आहे.
मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)
आरोग्याशी संबंधित कोणतीही मोठी समस्या तुम्हाला उद्भवणार नाही. परंतु काही वृद्धांना छातीशी संबंधित समस्या असू शकतात, ज्यासाठी त्यांना डॉक्टरांना भेट द्यावी लागेल. श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना आज सतर्क राहावं लागेल. तुम्हाला काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही तुमच्या शरिराला व्यायामाची सवय लावावी आणि जर तुम्हाला धूम्रपान सोडायचं असेल तर हा आठवडा चांगला आहे, तुम्ही या निर्णयात यशस्वी व्हाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :