Capricorn Horoscope Today 03 June 2023 : आज मनातील इच्छा पूर्ण करण्याचा दिवस, फक्त 'या' गोष्टीची काळजी घ्या; वाचा राशीभविष्य
Capricorn Horoscope Today 03 June 2023 : आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल, ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा अधिक वाढेल.
Capricorn Horoscope Today 03 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा असेल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. नवीन नोकरीची ऑफर देखील येईल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. जे व्यवसाय करत आहेत, त्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत देखील मिळतील. तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. आज तुमच्या प्रेम जीवनात आनंद असेल. जे लोक अविवाहित आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
मनातील इच्छा पूर्ण होतील
मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांच्या मनातील आज इच्छा पूर्ण होईल. अनेक दिवसांपासून जे विचार तुमच्या मनात दडले आहेत ते आज जवळच्या व्यक्तीसमोर व्यक्त करा. आज वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल, ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा अधिक वाढेल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तसेच, मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. महत्वाच्या कामाचे निर्णय घेताना मित्राचा सल्ला घ्या.
राजकारणातही चांगली संधी
ज्या तरूणांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला मोठ मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळू शकतो. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल.
आजचे मकर राशीचे आरोग्य
आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. यासाठी धावपळ कमी करा. कामाच्या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घ्या. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
मकर राशीसाठी आजचे उपाय
आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :