Budh Shukra Yog 2025 : 12 जूनपासून 'या' 5 राशींचा सुरु होतोय गोल्डन टाईम, बुध-शुक्राचा लाभ योगामुळे धनसंपत्तीत होणार चिक्कार वाढ
Budh Shukra Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 12 जून 2025 रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या 60 डिग्री अंशावर असतील. यामुळे अनेक शुभ लाभ निर्माण होणार आहेत.

Budh Shukra Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध-शुक्र ग्रहाच्या शुभ योगाचा (Yog) लाभ सर्व 12 राशींवर होणार आहे. मात्र, 5 राशींच्या (Zodiac Signs) लोकांना सर्वाधिक लाभ मिळणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची चाल आणि त्याच्या संक्रमणाने आयुष्यात शुभ अशुभ परिणाम पाहायला मिळतात. 2025 या वर्षात अनेक शुभ संयोग जुळून येणार आहेत. मात्र, बुध आणि शुक्र ग्रह शुभ स्थितीत असणार आहेत. 12 जून 2025 रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या 60 डिग्री अंशावर असतील. यामुळे अनेक शुभ लाभ निर्माण होणार आहेत.
मिथुन रास (Gemini Horoscope)
बुध आणि शुक्र ग्रहाची दृष्टी मिथुन राशीसाठी फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला लाभ मिळेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल.
तूळ रास (Libra Horoscope)
हा लाभ दृष्टी योग तूळ राशीसाठी फार शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. मुलांचं मन प्रसन्न असेल. तसेच, तुमच्या व्यवसायातून तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल. परदेशात काम करण्याची संधी चालून येईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या उत्पन्नात वाढ झालेली असेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे सोर्स वाढलेले असतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तरुणांना परीक्षेत चांगलं यश मिळेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी हा काळ फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या प्रॉपर्टीशी संबंधित तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















