Budh Shani Yuti 2025 : बुध-शनीच्या युतीने 4 राशींना मिळणार वरदान; 11 फेब्रुवारीपासून नशीब पालटण्याची होणार सुरुवात
Budh Shani Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 11 फेब्रुवारीला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.या ठिकाणी शनी आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे कुंभ राशीत बुध-शनीची युती होणार आहे.
Budh Shani Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने फेब्रुवारी महिना फार खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे म्हणजेच ग्रह आपली चाल बदलणार आहेत. यामुळे अनेक ग्रहांची युती देखील जुळून येणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, 11 फेब्रुवारी रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शनी ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे कुंभ राशीत बुध आणि शनीची युती होणार आहे. बुध आणि शनीच्या युतीमुळे त्रिएकादशी योग निर्माण होणार आहे. याचा 4 राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
बुध-शनीची युती मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. या युतीमुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. तसेच, उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सकारात्म योग जुळीन येणार आहेत. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्याने तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
बुध आणि शनीची युती मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारी ठरणार आहे. व्यवसायात पैसा गुंतवण्यासाठी हा काळ चांगला आहे. या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही व्यवसायात चांगली गुंतवणूक करु शकता. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
बुध आणि शनीची युती धनु राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवयात चांगली वाढ झालेली दिसून येईल. तसेच, जर तुम्हाला धार्मिक यात्रेला जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
बुध आणि शनीच्या युतीचा सकारात्मक प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवर होणार आहे. कारण बुध आणि शनीची युती कुंभ राशीतच जुळून येणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झालेली दिसेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ चांगला असेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: