Shani Asta 2025 : शनी राशी परिवर्तन होण्याआधीच 'या' 3 राशींची होणार चांदी; नव्या वर्षात करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट
Shani Asta 2025 : शनीच्या राशी परिवर्तनाचा वक्री, मार्गीचा परिणार सर्व 12 राशींवर होतो. शास्त्रानुसार, शनी 28 फेब्रुवारीला अस्त होणार आहे.
Shani Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावशाली ग्रह मानला जातो. शनी (Lord Shani) सर्व ग्रहांमध्ये सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. 29 मार्च 2025 रोजी शनी गुरुच्या राशीत म्हणजेच मीन राशीत संक्रमण करणार आहे.
शनीच्या राशी परिवर्तनाचा वक्री, मार्गीचा परिणार सर्व 12 राशींवर होतो. शास्त्रानुसार, शनी 28 फेब्रुवारीला अस्त होणार आहे. शनीच्या अस्ताने कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीचं कुंभ राशीत अस्त होणार असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. शनीच्या अस्तामुळे जे तुमचे काम संथ गतीने चालू होते ते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचं अस्त होणं फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमचं भाग्य तुमच्याबरोबर असेल. तुमच्यात चांगला आत्मविश्वास दिसून येईल. तसेच, या काळात तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, या काळात तुमच्याकडून पैशांची बचतदेखील होईल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी सुख-समृद्धीचा असणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शनीचं अस्त फार शुभकारक असणार आहे. या काळात प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तु्म्ही जे कार्य हाती घ्याल ते लवकरच पूर्ण होईल. तसेच, अचानक धनलाभ झाल्यामुळे तुम्ही फार खुश व्हाल. तुमच्या शत्रूंचा तुमच्याकडून पराजय होईल. तसेच, तुमच्या कार्याचं कौतुक केलं जाईल. तुमचे वैवाहिक जीवन फार चांगले असेल. तणापासून तुमची मुक्ती होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: