Budh Margi 2024 : 16 डिसेंबरला बुध ग्रह होणार मार्गी; 'या' 4 राशींचा आत्तापासूनच सुरु होणार सुवर्णकाळ
Budh Margi 2024 : 16 डिसेंबर रोजी दुपारी 01 वाजून 52 मिनिटांनी वृश्चिक राशीत मार्गी होणार आहे. बुध ग्रहाच्या मार्गीमुळे कोणकोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात.
Budh Margi 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध (Mercury) ग्रहाला व्यापार, बुद्धी आणि बौद्धिक क्षमतेचा कारक ग्रह मानला जातो. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह एका ठराविक वेळी आपली रास बदलतात. या राशी व्यतिरिक्त बुध ग्रह आपल्या चालीत बदल करतात. 2024 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात बुध ग्रह सरळ चाल चालणार आहेत. बुधाची ही सरळ चाल अनेक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरु शकते. 16 डिसेंबर रोजी दुपारी 01 वाजून 52 मिनिटांनी वृश्चिक राशीत मार्गी होणार आहे. बुध ग्रहाच्या मार्गीमुळे कोणकोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
बुध ग्रहाच्या मार्गीमुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंददायक असणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या कार्यातील सर्व विघ्न दूर होतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं मार्गी होणं फार शुभदायक असणार आहे. या काळात तुमच्यावर कामाच्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होण्याचे संकेत आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच, तुमचं मन प्रसन्न असेल. तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ होण्याचे अनेक संकेत आहेत.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाच्या मार्गीमुळे आनंदाचं वातावरण असणार आहे. या काळात तुम्हाला कुटुंबियांकडू एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवाल. तुमच्यासाठी नोकरीचे नवीन पर्याय उपलब्ध होतील. तसेच, तुमच्या कुटुंबात संपत्तीवरुन सुरु असलेला वाद लवकरच संपेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
बुध ग्रहाची सरळ चाल कुंभ राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक असणार आहे. बुध ग्रहाच्या प्रभावाने तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात चांगला नफा होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :