एक्स्प्लोर
Advertisement
Bhaumvati Amavasya 2023 : आज 2023 मधील शेवटची अमावस्या; अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? समज आणि गैरसमज
Bhaumvati Amavasya 2023 : बऱ्याचदा अमावस्येला अशुभ मानलं जातं. या दिवशी अनेक गोष्टी करणं टाळलं पाहिजे, असं मानलं जातं. यानुसार अमावस्येला नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या करू नये हे जाणून घेऊया.
Bhaumvati Amavasya 2023 : हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं. 2023 या वर्षातील शेवटची अमावस्या 12 डिसेंबरला आहे. कार्तिक महिन्यात ही अमावस्या आल्याने याला कार्तिकी अमावस्या (Kartiki Amavasya) म्हणतात. अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने विशेष लाभ होतो, तर अमावस्येच्या दिवशी बऱ्याच गोष्टी टाळल्या पाहिजेत, असं सांगितलं जातं. अमावस्येला नेमकं काय करावं आणि काय करू नये? याबद्दल अधिक जाणून घेऊया.
अमावस्येला कोणत्या गोष्टी करू नये?
- अमावस्येच्या दिवशी मांस, मद्य किंवा इतर मादक पदार्थांचं सेवन करू नये, असं म्हटलं जातं. अमावस्येच्या दिवशी नशा केल्याने किंवा तामसिक पदार्थांचं सेवन केल्याने नकारात्मकता वाढते. हा तुमच्या प्रगतीतील अडथळा मानला जातो.
- अमावास्येला दारावर आलेल्या भिकार्याला रिकाम्या हाती पाठवू नये, अशी मान्यता आहे. त्याला अन्न आणि काही गोड वस्तू दान करावी, याने वैवाहिक जीवनात मधुरता येते, असं मानलं जातं. लग्न होत नसलेल्या मुलींसाठी हा चांगला उपाय मानला जातो.
- अमावस्येच्या दिवशी ब्रह्मचर्य नियमांचं उल्लंघन करू नये, असं म्हटलं जातं. चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या तीन दिवशी पवित्र राहणं योग्य असल्याचं सांगितलं जातं.
- अमावास्येला वाणीत कटूता नसावी, असं मानलं जातं.
अमावास्येला नेमकं काय करावं?
- अमावस्येच्या दिवशी दान करावं, असं म्हटलं जातं. अमावस्येला दानधर्म केल्यामुळे पुण्य मिळतं, असं मानलं जातं.
- पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येला पितरांची पूजा करावी, असं सांगितलं जातं. असं केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद लाभतो, अशी मान्यता आहे.
- व्यवसायात नुकसान होत असल्यास किंवा कारखान्यात सतत काही अपघात होत असल्यास पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावं, यानंतर पक्ष्यांना दाणे टाकायला हवे. अमावस्येच्या दिवशी हा विशेष उपाय केल्याने लाभ मिळतो, अशी धारणा आहे.
- अमावास्येची रात्र पितृ देवांना समर्पित असते, म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालीसाचा पाठ करावा, असं सांगितलं जातं. पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा, यामुळे सुख-समृद्धी नांदते.
- वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला दुखापत होत असल्यास अमावास्येला मुंग्यांच्या वारुळावर एक पाव गूळ चढवावं, अशी मान्यता आहे. असं केल्यास शारीरिक समस्या दूर होत असल्याचं मानलं जातं.
(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
आरोग्य
Advertisement