एक्स्प्लोर

Bhaubeej 2024 : भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कोणता? वाचा लाडक्या भाऊरायाला ओवाळण्याची शुभ वेळ

Bhaubeej 2024 : दिवाळीत भाऊ-बहि‍णींना विशेष आकर्षण असतं ते भाऊबीजेचं दिवाळीची समाप्तीच भाऊबीजेने होते.

Bhaubeej 2024 : आनंदाचा आणि उत्साहाचा असा दिवाळीच्या (Diwali 2024) सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीत भाऊ-बहि‍णींना विशेष आकर्षण असतं ते भाऊबीजेचं (Bhaubeej). दिवाळीची समाप्तीच भाऊबीजेने होते. भाऊबीजेचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवशी असतो. हा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. 

भाऊबीज कधी आहे?

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजून 22 मिनिटांनी सुरु होईल. तर 3 नोव्हेंबरला रात्री 10 वाजून 6 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार भाऊबीजेचा सण हा 3 नोव्हेंबरला साजरा केला जाईल. 3 तारखेला सकाळी 11 वाजून 39 मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहिल. तर यानंतर शोभन योग असणार आहे. त्यामुळे भाऊरायाला ओवाळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ ही सकाळी 11 वाजून 45 मिनिटांपर्यंत असेल.  

भाऊबीजेचे महत्त्व

भाऊबीज हा सण हिंदू सणांमधील महत्त्वाचा आणि प्रसिद्ध सण मानला जातो. या सणाचे महत्त्व भाऊ आणि बहिणींमधील आदर आणि प्रेम व्यक्त करणे आहे. भाऊबीजेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला साजरी केली जाते. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. त्यावेळी बहिणीने दाखविलेल्या आदराने प्रसन्न होऊन त्यांनी ऊ-बहिणी या दिवशी यमुनेत स्नान करून यमाची पूजा करतील असे वरदान दिले. मृत्यूनंतर त्याला यमलोकात जावे लागणार नाही. याबद्दल अशी देखील मान्यता आहे की, नरकासुराचा वध करुन भगवान श्रीकृष्ण द्वारकेत परतले होते. यावेळी त्यांची बहिण सुभद्रा हिने त्यांना फुले, मिठाई आणि दिवे लावून स्वागत केले होते. कपाळावर टिळा लावून दीर्घायुष्य प्राप्त होण्याची प्रार्थना केली होती.

पूजेची परंपरा 

भाऊबीजेच्या दिवशी बहीण सकाळी आंघोळ करून कुलदैवत, भगवान विष्णू किंवा श्री गणेशाची पूजा करते. या दिवशी बहीण भावाच्या हाताला कुंकू आणि तांदळाचा लेप लावते, आणि त्यावर पाच विड्याची पाने, सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवते. नंतर भावाच्या हातावर धांगा बांधून पाणी शिंपडत भावाच्या दीर्घायुष्यासाठी मंत्राचा उच्चार करते. काही ठिकाणी, बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावत त्याला औक्षण करते, आणि भावाच्या मनगटावर धागा बांधते. मग ती तिच्या भावाला मिठाई भरवते. आणि दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. भाऊबीजेला भावाचे औक्षण करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या ताटामध्ये कुंकू, फुले, अक्षता, सुपारी, विड्याची पाने, चांदीचे नाणे, नारळ, फुलांच्या माळा, मिठाई, धागा, केळी असावी. या सर्व गोष्टींशिवाय भाऊबीज हा सण अपूर्ण मानला जातो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Diwali 2024 : आज लक्ष्मीपूजन; जाणून घ्या अचूक तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Shani Vakri 2026 : शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Nag Panchami 2026: नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget