Uttarakhand : बद्रीनाथमधून थरकाप उडवणारा VIDEO समोर; पत्त्यांच्या बंगल्यासारखा डोंगर कोसळला, चमोली-बद्रीनाथ महामार्ग तु्र्तास ठप्प
Landslide In Chamoli : सततच्या पावसामुळे बद्रीनाथमधील परिस्थिती बिकट आहे, सततच्या पावसाने डोंगराला तडे जात आहेत. यातच आता चमोली जिल्ह्यातील पाताळगंगेचा डोंगर क्षणार्धात मातीमोल झाला, या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
Uttarakhand Landslide : उत्तराखंडमधील (Uttarakhand Landslide) चमोलीजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे चमोली-बद्रीनाथ महामार्ग (Chamoli-Badrinath Highway) पूर्णपणे ठप्प झाला आहे. भूस्खलनामुळे पाताळ गंगा परिसरात खळबळ उडाली आहे. काही क्षणात डोंगराला तडे जाऊन डोंगर मातीमोल झाला आहे. या डोंगराचा मलबा रस्त्यावर विखुरला असल्यामुळे जोशीमठ-बद्रीनाथ महामार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची बातमी आतापर्यंत नाही.
डोंगर कोसळल्यामुळे महामार्ग पूर्णत: ठप्प
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, येथून सतत डोंगर कोसळल्याच्या बातम्या येत आहेत. आता चमोली जिल्ह्यातूनही डोंगर कोसळल्याचा विदारक व्हिडीओ समोर आला आहे. अगदी क्षणार्धात पत्त्याच्या बंगल्यासारखा हा डोंगर कोसळला, डोंगर कोसळल्यानंतर मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे NH-7 जोशीमठ-बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे. हा महामार्ग बंद झाल्यामुळे चारधाम यात्रेला जाणाऱ्या काही भाविकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. डोंगर कोसळल्याने सध्या रस्ता पूर्णपणे बंद आहे.
#WATCH | Uttarakhand: The road near Patalganga Langsi Tunnel on Badrinath National Highway has been blocked due to a landslide from the hill: Uttarakhand Police
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 10, 2024
(Source: Uttarakhand Police) pic.twitter.com/d3Gc9YQiYA
एक दिवस उलटत नाही तेच दुसरी दरड कोसळली
याआधी मंगळवारी, 9 जुलै रोजी जोशीमठ येथील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर भीषण दरड कोसळली होती. यातही संपूर्ण डोंगर पूर्णपणे कोसळला होता. दरड कोसळल्याने बराच मातीचा ढिगारा रस्त्यावर साचला. यानंतर बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. दरवर्षी पावसाळ्यात उत्तराखंडमध्ये अनेक भागात डोंगर कोसळण्याच्या घटना घडतात.
हेही वाचा:
मोठी बातमी: पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद