August Month 2025 Planet Transit : ऑगस्ट महिन्यात 'या' राशी होतील बलवान; सूर्य, मंगळ ग्रहांसह 'या' मोठ्ठ्या ग्रहांचं होणार संक्रमण, तुमची रास यात आहे का?
August Month 2025 Planet Transit : ऑगस्ट महिन्यात, बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन होणार आहे. याचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.

August Month 2025 Planet Transit : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीने राशीमध्ये संक्रमण करतात. यालाच ग्रहांचं राशी परिवर्तन म्हणतात. ग्रहांच्या या चालीचा प्रत्येक 12 राशींवर शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळतो. तसेच, आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर देखील याचा परिणाम होतो. ऑगस्ट 2025 मध्ये देखील मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. या महिन्यात, बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन होणार आहे. याचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
ऑगस्ट महिन्यातील ग्रहांच्या संक्रमणाची यादी 2025
बुध ग्रह संक्रमण 2025
कधी? - 8 ऑगस्ट 2025, शुक्रवार
कोणत्या राशीतून होणार संक्रमण? - कर्क राशीतून सिंह राशीत होणार प्रवेश
प्रभाव - बुध ग्रहाच्या संक्रमणाने सिंह राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात चांगली वाढ पाहायला मिळेल. तुमच्या विचारात स्पष्टता येईल. तसेच, प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. संवादकौशल्य चांगलं राहील.
शुक्र ग्रह संक्रमण 2025
कधी? - 13 ऑगस्ट 2025, बुधवार
कोणत्या राशीतून होणार संक्रमण? - सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश होणार
प्रभाव - या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात फार बदल झालेला दिसून येईल. तसेच, प्रेमसंबंध आणि व्यवहारात याचा सर्वात जास्त प्रभाव तुमच्यावर दिसणार आहे. तसेच, तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल.
सूर्य ग्रह संक्रमण 2025
कधी? - 17 ऑगस्ट 2025, रविवार
कोणत्या राशीतून होणार संक्रमण? - कर्क राशीतून सिंह राशीत होणार प्रवेश
प्रभाव - सूर्य ग्रहाच्या संक्रमणाने तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या कामाकाजात चांगली वाढ झालेली दिसेल. लीडरशिप क्वालिटी दिसून येईल. पुढच्या महिन्यापर्यंत हा काळ तुमच्यासाठी फार शक्तिशाली असणार आहे.
मंगळ ग्रह संक्रमण 2025
कधी? - 25 ऑगस्ट 2025, सोमवार
कोणत्या राशीतून होणार संक्रमण? - कन्या राशीतून तूळ राशीत होणार प्रवेश
प्रभाव - मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने तुमच्यातील न्याय आणि संतुलन वाढणार आहे. त्याचबरोबर तुमचा सकारात्मक दृष्टीकोन वाढलेला असेल. ज्योतिष शास्त्रानुसार, तूळ राशीसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















