Astrology universe signs: जेवणात केस सापडणे कोणत्या गोष्टीचा संकेत? ज्योतिषशास्त्रात काय सांगितलंय?
Shani dev signs: अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या लहानसहान घटना या मोठ्या गोष्टींबाबतचे संकेत असू शकतात. मात्र, ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. जेवणात केस सापडणे...

Astrology universe signs: आपण घरात किंवा बाहेर जेवताना आपल्या ताटातील खाद्यपदार्थांमध्ये केस सापडल्याचा प्रकार तुमच्यासोबत कधीतरी घडला असेल. अशावेळी आपण चिडतो, अस्वच्छतेबाबत घरच्यांना किंवा हॉटेलवाल्याला दोष देतो. जेवणात केस सापडणे, ही गोष्ट नजरचुकीने किंवा निष्काळजीपणामुळे घडली हा आपला सर्वसाधारण समज असतो. मात्र, सनातन धर्म (Sanatan Dharma) आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) जेवणात केस सापडणे, ही साधीसुधी बाब नाही. तर या माध्यमातून विश्व चालवणारी अदृश्य शक्ती तुम्हाला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे, असे मानले जाते.
सनातन धर्म आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही गोष्ट ही अपघाताने किंवा वारंवार घडत नाही. जेवणात केस सापडणे, ही वरवर लहान वाटणारी गोष्ट असली तरी तिचा काहीतरी अर्थ असतो. त्यामुळे अशा गोष्टींकडे अधिक बारकाईने पाहण्याची गरज आहे. तरच तुम्हाला दैवी किंवा अदृश्य शक्तींकडून दिले जाणारे संकेत ओळखता येऊ शकतात.
Bad luck signs: जेवणात केस सापडण्याचा नेमका अर्थ काय?
शनीदेव (Saturn)- शनी हा तुमच्या कर्मानुसार कठोर मूल्यमापन करतो. शनीदेव तुम्हाला कोणताही गोष्ट थेटपणे सांगत नाही. दैनंदिन जीवनाच्या धबडग्यात शनी (Shani Dev) तुम्हाला लहान लहान गोष्टीतून संकेत देतो. अनेकदा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी उशीर होतो, तुमच्या वस्तू हरवतात त्याचप्रमाणे जेवणात केस सापडणे, हादेखील संकेत असतो.
जर तुमची साडेसाती सुरु असेल किंवा तुमच्या राशीला शनीची महादशा सुरु असले तर अशाप्रकारचे संकेत विशिष्ट पद्धतीने तुम्हाला मिळतात. परंतु, बहुतांश लोक लहानसहान गोष्ट असल्यामुळे या संकेतांकडे दुर्लक्ष करतात. परंतु, या गोष्टी वारंवार घडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. या लहानसहान गोष्टी म्हणजे शनीदेवाने तुम्हाला दिलेला एखादा संकेत असू शकतो. शनीदेव हा कठोर असतो, तो माणसाला त्रास देतो, अशा एक सर्वसामान्य समज आहे. मात्र , प्रत्यक्षात शनीदेव हा तुम्हाला शिक्षा देत नाही तर तो तुम्हाला काही गोष्टींची जाणीव करुन देतो, काही धडे शिकवतो.
Shani Dev: शनीदेव तुम्हाला काय संकेत देतो?
1. तुमच्या जुन्या कर्मांबाबत जागरुक राहा, त्याबाबतच्या आवश्यक गोष्टी वेळीच मार्गी लावा.
2. नकारात्मक गोष्टींची साखळी तोडा
3. तुम्ही कोणत्या गोष्टींना आयुष्यात स्थान देत आहात, याकडे बारकाईने पाहा. जेवण आणि मानसिक या दोन्ही स्तरांवर या गोष्टी लागू होतात.
आणखी वाचा
तब्बल 27 वर्षांनंतर शनी बदलणार चाल; 'या' 3 राशींवर बरसणार शनीदेवाची कृपा, कर्माचं फळ मिळणार


















