Astrology : तब्बल 30 वर्षांनंतर सूर्य-शनीच्या संयोगाने जुळून येणार समसप्तक योग; 'या' राशींना मिळणार चिक्कार लाभ
Astrology : तब्बल 30 वर्षांनंतर सिंह कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 180 डिग्री अंतरावर असणार आहेत.
Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग (Yog) निर्माण होतात. याचाच परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. खरंतर, ग्रहांचा राजा सूर्याने (Sun) 16 ऑगस्ट रोजी स्वराशी सिंह राशीत संक्रमण केलं होतं. तर, तब्बल 30 वर्षांनंतर सिंह कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 180 डिग्री अंतरावर असणार आहेत. यामुळे समसप्तक योग जुळून आला आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर पडणार आहे. मात्र, तीन राशींच्या लोकांचं या दरम्यान नशीब चमकू शकतं. या राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या तीन राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग फार शुभकारक असणार आहे. या शुभ योगाने समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमच्या बुद्धीचा चांगला विकास होईल. नोकरगार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, वैवाहिक जीवन तुमचं चांगलं असणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
समसप्तक योगाने मेष राशीच्या लोकांचे चांगले दिवस लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नाचे अनेक नवीन सोर्स वाढत जातील. तुमच्या व्यापारात चांगली वाढ होईल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना समसप्तक योगाचा चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुम्हाला परदेशात जाण्याची चांगली संधी आहे. या काळात अनेक दिवसांपासून तुमच्या सुरु असलेल्या आर्थिक समस्या संपुष्टात येतील. फक्त अनावश्यक खर्च करु नका. वाहन, नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: