Astrology : 10, 20 नाही तर तब्बल 30 वर्षांनी शनी-शुक्राचा संयोग, 2025 पर्यंत या 3 राशींला लागणार जॅकपॉट
Shukra - Shani Yuti : ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह जवळपास 26 दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतात. डिसेंबर महिन्यात शुक्र 28 तारखेला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
Shukra - Shani Yuti : ज्योतिष शास्त्रानुसार, धन-संपदा आणि सुख समृद्धीचा दाता शुक्र ग्रह हा सर्वात महत्त्वाच्या ग्रहांपैकी एक आहे. शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाने त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. 2024 वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात शुक्र ग्रह दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह जवळपास 26 दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतात. डिसेंबर महिन्यात शुक्र 28 तारखेला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा काही राशींना लाभ तर काही राशींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे 2025 मध्ये कोणत्या राशींवर शुक्र आणि शनीची कृपा असेल ते जाणून घेऊयात.
द्रिक पंचांगानुसार, 28 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शनीही विराजमान आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीत शनी आणि शुक्र आठव्या चरणात विराजमान आहे. त्यामुळे या राशींना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, या काळात तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करु शकात. अनेक शुभ योग या काळात जुळून येणार आहेत. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तसेच, पदोन्नतीसह तुमच्या वेतनातही चांगली वाढ पाहायला मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना या शुभ योगामुळे भरपूर फायदा मिळणार आहे. या काळात धनलाभाचे अनेकशुभ योग आहेत.तुमची वाहन, प्रॉपर्टी खरेदी संदर्भातील इच्छा लवकरच पूर्ण होताना दिसेल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद असेल. तुमचे गैरसमज दूर होतील. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची देखील चांगली संधी आहे.
मिथुन रास (Pisces Horoscope)
मिथुन राशीत शुक्र आणि शनीची युती नवव्या चरणात असणार आहे. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. मित्र-परिवाराबरोबर तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तसेच, उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमच्या आरोग्यातही चांगली सुधारणा पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात धार्मिक आणि आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: