Astrology : घरात कबुतरांनी अंडी घालणं शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं? वाचा सविस्तर
Astrology Pigeon Eggs : कबुतरांचं घराच्या खिडकीत किंवा एखाद्या भागात अंडी देण्यावरुन दोन समजुती आहेत. बाल्कनीत कबुतरांचं अंडी देणं शुभ असतं. तर, काही जण याला अशुभ मानतात.

Astrology Pigeon Eggs : हिंदू धर्मशास्त्रानुसार, पशु-पक्ष्यांचं घरात येणं अर्थात काही अपवाद सोडता फार शुभ मानलं जातं. एकीकडे कबुतरांचं (Kabutar Khana) घरात येणं शुभ मानलं जातं. मात्र, कबुतरांचं घराच्या खिडकीत किंवा एखाद्या भागात अंडी देण्यावरुन दोन समजुती आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की, बाल्कनीत कबुतरांचं अंडी देणं शुभ असतं. तर, काही जण याला अशुभ मानतात. या संदर्भात वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात.
बाल्कनीत कबुतराचं अंडी देणं शुभ की अशुभ?
वास्तूशास्त्रानुसार, कबुतराचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे कबुतरांचं घरी येणं शुभ आहे मात्र, घरात घरटं बनवून कायमस्वरुपी राहणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळेच कबुतरांना घरात घरटं बांधून देऊ नये.
वास्तूशास्त्रात, असंही म्हटलं आहे की, घरात येणाऱ्या कबुतरांना दाणे घातल्याने बुध ग्रहाचे दोष कमी होतात. तर, कबुतरांचं घरात अंडी देणं शुभ मानलं जातं. यातून चांगले दिवस, भरभराटीचे दिवस येण्याचा संकेत मिळतो. यामुळे घरात देवी लक्ष्मीची कृपा राहते.
दिशेनुसार कबुतरांनी अंड देण्याचा अर्थ
वास्तूशास्त्रानुसार, कबुतर घराच्या कोणत्या दिशेला अंडी देतं याचे देखील वेगवेगळे अर्थ मानलं जातात. या शास्त्रानुसार, दिशेनुसार, कबुतरांची अंडी देण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे फळ प्राप्त होते.
- घराच्या पूर्व दिशेला कबुतरांनी अंडी दिल्याने मान-सन्मानात चांगली वाढ होते.
- आग्नेय दिशा (दक्षिण-पूर्व) दिशेला कबुतरांनी अंडी दिल्याने संतान प्राप्ती मिळते. चांगल्या ठिकाणी लग्न होते.
- घराच्या दक्षिण दिशेला कबुतरांनी अंडी दिल्याने धन संपत्तीत चांगली भरभराट होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :




















