Astrology : आज शिव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मेषसह 'या' 5 राशींना मिळणार जबरदस्त लाभ, संकटांचा होणार विनाश
Astrology Panchang Yog 24 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 24 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 24 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा वार रविवार असल्या कारणाने हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, आजपासून भाद्रपद महिन्याची देखील झाली आहे. भाद्रपद हा अत्यंत शुभ महिना मानला जातो. त्यानुसार, जाणून घेऊयात आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. आज तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाईल. नवीन विचार अंगीकाराल. तसेच, चांगल्या सवयी जोपासाल. उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. समाजात देखील तुमचं कौतुक केलं जाईल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामातून सुख मिळेल. तसेच, संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. चांगल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक कराल. भविष्याबाबत तुम्ही जास्त विचार कराल. करिअरच्या बाबतीत योग्य तो निर्णय लवकरच घ्याल. आरोग्याची चिंता करण्याची गरज नाही.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळेल. तसेच, समाजात उच्च अधिकाऱ्यांशी भेटीगाठी होतील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधीदेखील मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. तुम्ही पार्टनरशिपमध्ये नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तसेच, नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. जोडीदाराची तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर चांगली साथ मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज समाजातील काही प्रभावशाली लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबियांचं मत विचारात घ्या. मित्रांचा सपोर्ट देखील तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
हेही वाचा :




















