Astrology : आज रंगपंचमीच्या दिवशी जुळून आला धन योगाचा शुभ संयोग; कर्क राशीसह 'या' 5 राशींवर धनदेवता होणार प्रसन्न
Astrology Panchang Yog 14 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 14 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 14 मार्च म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. आज धुलिवंदनाच्या दिवसाबरोबरच चंद्रग्रहणाचा (Chandra Grahan) दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज धन योगासाह अनेक शुभ संयोग (Yog) जुळून आले आहेत. आजचा दिवस अनेक राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. तसेच, या राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज तुमची समाजातील नवीन लोकांशी गाठीभेटी होतील. तसेच, जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला संवाद साधाल. तसेच, तुमच्या व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. तुम्हाला चांगली डील मिळण्याची शक्यता आहे. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. कुटुंबात तुमच्याकडून काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. नवीन प्रोजेक्टवर सुरुवात करु शकता.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज मित्रांबरोबर तुमच्या गाठीभेटी होतील. तसेच, आर्थिक सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे साध्य होतील. आज जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामाजिक दृष्टीकोनातून चांगला असणार आहे. भावा-बहिणींचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, आजच्या दिवसात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे सहज पूर्ण करता येतील. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण पाहायला मिळेल. त्यामुळे तुमचं मन देखील खुश असेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुम्ही दिवसभर प्रसन्न असाल. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्यांच्ं मार्गदर्शन देखील तुम्हाला मिळेल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















