Astrology : आज ब्रम्ह योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींना मिळणार विशेष लाभ, सुखसोयींत होणार वाढ
Panchang 6 April 2024 : आज ब्रम्ह योग, लक्ष्मी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस मेष राशीसह 5 राशींसाठी फलदायी ठरणार आहे. तसेच शनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित आहे, त्यामुळे आज या 5 राशींवर शनीची देखील कृपा राहील.
Astrology Today 6 April 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज शनिवार, 6 एप्रिल रोजी एक अद्भुत योग घडत आहे, आज शनिवारच्या दिवशी चंद्र शनीच्या (Shani) कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असून या तिथीला प्रदोष तिथी व्रत पाळण्यात येणार आहे, ही तिथी शनिवारी येत असल्याने हा व्रत शनि प्रदोष व्रत म्हणून ओळखला जाईल.
शनि प्रदोष व्रताच्या दिवशी ब्रह्मयोग, लक्ष्मी योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोगही होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. मेष राशीचे लोक आज त्यांची सर्व अपूर्ण कामं पूर्ण करतील आणि त्यांच्या बोलण्याच्या शैलीने लोकांवर प्रभाव टाकतील. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर आज तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु तुम्ही सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात कराल आणि यशस्वी व्हाल. नोकरदार लोक आज सहकाऱ्यांच्या मदतीने आपली कामं वेळेवर पूर्ण करतील आणि मित्रांसोबत मौजमजा करण्याच्या मूडमध्येही असतील. तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावाल. तुमच्या शेजारच्या लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. आई-वडिलांचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील, त्यामुळे तुमचा ताण कमी होईल. घरातील मुलं आनंदी राहतील आणि तुमचा जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कर्क राशीचे लोक आज खूप आनंदी दिसतील आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवतील. नोकरदार लोकांवर कामाचा ताण कमी असेल, ते आपली कामं वेळेवर पूर्ण करतील. तुम्ही मित्रांशी नवीन नोकरीबद्दल बोलू शकता. तुम्ही कुटुंबातील सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत राहाल. तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात असलेल्या सर्व जबाबदाऱ्या योग्यपणे पार पाडाल. धार्मिक कार्यातही उत्साहाने सहभागी व्हाल. वैवाहिक जीवनात काही वाद सुरू असतील तर ते आज बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा.
कन्या रास (Virgo)
आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, तुमच्या ऐषोरामात वाढ होईल, नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. जर तुमच्यावर कर्ज असेल तर तुम्ही त्याची परतफेड करू शकाल. आज व्यावसायिकांना मोठी डील मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळेल. या राशीचे लोक ज्यांना शिक्षण, नोकरीसाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज शनिदेवाच्या कृपेने पूर्ण होईल. अविवाहित लोक आज एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात. आज कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यावसायितांना आज चांगली डील मिळेल. व्यवसायात तुम्हाला नफा होईल. आज तुम्हाला एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या देखील ऐकायला मिळतील. तुमचे काही विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. तुमच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने तुम्ही एखादं छोटसं काम सुरू करण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या आईसोबत काही नातेवाईकांच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल, जिथे तुम्ही अनेक लोकांना भेटाल आणि जुन्या आठवणी ताज्या होतील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. मकर राशीचे लोक आज धार्मिक कार्यात भाग घेतील. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसाठी काही भेटवस्तू देखील खरेदी करू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने घरात प्रसन्न वातावरण राहील. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील, त्यांना आपापल्या क्षेत्रात यश मिळेल आणि प्रगतीही होईल. घरातील मुलांशी तुम्ही चांगले वागाल. तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. तुम्ही संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत जेवायलाही बाहेर जाऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: