Astrology : आज त्रिकोण योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 3 राशींना मिळणार तिप्पट लाभ, संपत्तीत होणार अपार वाढ
Panchang 21 January 2025 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी त्रिकोण योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 3 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 21 January 2025 : आज मंगळवार, 21 जानेवारीला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर आज चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल. चंद्र आणि मंगळ यांच्यामध्ये नवम पंचम योग तयार होईल. तर चंद्र शुक्रासोबत त्रिकोण योग निर्माण करेल. यासोबतच आज धृतिमान नावाचा योगही तयार होत आहे. या योगांमुळे आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आज 21 जानेवारीचा दिवस मंगळाच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. धाडसी निर्णय घेतल्याचा आज तुम्हाला फायदा मिळेल. आज तुमचं आरोग्य ठणठणीत राहील. ज्या संधीची बरेच दिवसांपासून वाट पाहत होता ती संधी आज तुम्हाला मिळेल. तुमच्या नोकरीत तुम्हाला आज तुमच्या अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचं कोणतंही महत्त्वाचं प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाची मदत लाभेल, त्यामुळे त्याच्याशी समन्वय ठेवा. जे लोक परदेशाशी संबंधित कोणतंही काम करतात, त्यांना विशेष लाभ मिळणार आहे.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा मंगळवार खूप शुभ आणि फलदायी ठरेल. आज चंद्र तुमच्या कुंडलीच्या आनंदी स्थानात असेल आणि तुम्हाला आनंद देईल. तुमच्या काही मोठ्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही काम किंवा जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. वाहन खरेदीचा प्रयत्न करणाऱ्यांना या कामात यश मिळेल. कर्क राशीच्या लोकांसाठी जे दागिने आणि कपड्यांच्या व्यवसायात गुंतलेले आहेत, आजचा दिवस कमाई आणि कामाच्या बाबतीत चांगला असेल. एखाद्या नातेवाईकाकडूनही चांगली बातमी मिळेल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीला आज अनपेक्षित लाभ मिळतील. तुम्हाला अपेक्षित नसलेल्या स्त्रोताकडून लाभ मिळू शकतो. आज तुम्हाला तुमचे वडील आणि मोठ्या भावाचं सहकार्य मिळेल. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा होईल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. तुम्हाला बॉसच्या मदतीने फायदे मिळतील आणि भविष्यात पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात तुम्हाला यश प्राप्त होईल आणि मुलांकडून आनंद मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: