एक्स्प्लोर

Astrology : आज रवि योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींचं नशिबाला मिळणार झळाळी, धनात होणार अपार वाढ

Panchang 14 September 2024 : आज शनिवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी रवि योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 14 September 2024 : आज शनिवार, 14 सप्टेंबर रोजी चंद्र शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला पद्म एकादशी तिथीचं व्रत केलं जाईल. पद्म एकादशी व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि उत्तराषाद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज संपूर्ण दिवस मस्तीच्या मूडमध्ये असतील आणि काही नातेवाईकांना भेटण्याची संधीही मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ चाखण्यासाठी आणि ऐषोआरामाने जीवन जगण्यासाठी आजचा दिवस उत्तम असेल. व्यवसायात वाढ झाल्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहील. तुम्ही संध्याकाळ मित्रांसोबत हँग आउटमध्ये घालवाल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वरदानापेक्षा कमी नाही. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. सामाजिक जबाबदाऱ्या वाढतील. मोठ्या भावांसोबत मतभेद वाढू देऊ नका. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही यावेळी हा धोका पत्करू शकता. तुमच्या यशाची शक्यता लक्षणीय वाढली आहे.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. आज पैशांची बचत करण्यासोबतच, तुम्ही काही दीर्घकालीन गुंतवणुकीचीही योजना कराल, ज्यामुळे तुम्ही भविष्यात चांगला नफा मिळवू शकाल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून काही चांगली बातमी ऐकू येईल, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. व्यापारी लोकांची व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. कर्मचारी आज रिलॅक्स मूडमध्ये असतील आणि रविवारच्या सुट्टीचा पूर्ण आनंद घेतील. 

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. आज तुमचा बँक बॅलन्सही वाढेल. शनिवारच्या सुट्टीमुळे व्यवसायात पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या राशीचे लोक ज्यांना परदेशात फिरायला जायचं आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या आईसोबत काही धार्मिक कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये एकता दिसून येईल. संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत देवाच्या दर्शनाचा लाभ घ्याल.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल आणि नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. आज तुमचं बोलणं खूप प्रभावी असेल, ज्यामुळे इतर लोक तुमच्यावर लवकरच प्रभावित होतील. नशिबाने तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ दिल्याने तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी दिसतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला काढू नका शूज आणि चपला; गरिबी येईल चालून, पाण्यासारखा वाया जाईल पैसा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ayush Komkar : दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांकडून आयुष उर्फ गोविंद कोमकर याच्यावर गोळीबार, पुण्यात श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये नेमकं काय घडलं?
आयुष कोमकर गाडी पार्क करायला गेला, हल्लेखोर धावत गेले अन् गोळ्या झाडल्या, पुणे गँगवॉरनं हादरलं
Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ
Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ
Pune Crime : वर्षभरापूर्वी नाना पेठेत रस्त्याच्या पलीकडे वनराज आंदेकरला संपवलेलं, आज आयुष कोमकरला संपवलं, पुण्यात सूडनाट्य
वनराज आंदेकरच्या मारेकऱ्यांमध्ये गणेश कोमकर अटकेत, आज 19 वर्षांच्या आयुष कोमकरची हत्या, पुणे हादरलं...
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayush Komkar : दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांकडून आयुष उर्फ गोविंद कोमकर याच्यावर गोळीबार, पुण्यात श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये नेमकं काय घडलं?
आयुष कोमकर गाडी पार्क करायला गेला, हल्लेखोर धावत गेले अन् गोळ्या झाडल्या, पुणे गँगवॉरनं हादरलं
Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ
Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ
Pune Crime : वर्षभरापूर्वी नाना पेठेत रस्त्याच्या पलीकडे वनराज आंदेकरला संपवलेलं, आज आयुष कोमकरला संपवलं, पुण्यात सूडनाट्य
वनराज आंदेकरच्या मारेकऱ्यांमध्ये गणेश कोमकर अटकेत, आज 19 वर्षांच्या आयुष कोमकरची हत्या, पुणे हादरलं...
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार
Pune Crime : वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला, गोविंदा कोमकरचा तीन गोळ्या झाडत खून, गँगवॉरमध्ये मामाच्या हत्येचा बदला भाच्याच्या हत्येनं, पुणे हादरलं
आंदेकर-कोमकर टोळीत गृहयुद्ध, मामाच्या हत्येचा बदला भाच्याच्या हत्येनं, पुणे हादरलं
त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती, सदानंद मोरेंचा समावेश, नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार
त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती, सदानंद मोरेंचा समावेश, नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार
अभिनेते आषिश वारंग यांचं निधन; सिंबा, मर्दानीसारख्या हीट सिनेमात पोलिसाच्या भूमिका गाजल्या
अभिनेते आशिष वारंग यांचं निधन; सिंबा, मर्दानीसारख्या हीट सिनेमात पोलिसाच्या भूमिका गाजल्या
Embed widget