(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज चंद्राधी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, मनातील सर्व इच्छा होणार पूर्ण
Panchang 01 December 2024 : आज रविवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी राशी चंद्राधी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 3 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 01 December 2024 : आज रविवारी, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी चंद्राचं वृश्चिक राशीत भ्रमण होत असून चंद्रापासून सातव्या भावात गुरूचं स्थान असल्यामुळे चंद्राधी योग तयार होत आहे. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून ही तिथी कार्तिक अमावस्या म्हणून ओळखली जाते.
कार्तिक अमावस्येच्या दिवशी चंद्राधी योगाचा सुकर्म योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 3 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज म्हणजेच १ डिसेंबरचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आशेचा किरण घेऊन आला आहे. मेष राशीचे लोक आज कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतील आणि रविवारच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतील. ट्यूशन किंवा कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत त्यांची क्षमता दाखवून विद्यार्थी अभ्यासात स्वतःचं एक स्थान निर्माण करू शकतील. आज सूर्यदेवाच्या कृपेने भाड्याने राहणाऱ्या लोकांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल, ज्यामुळे त्यांचं मन प्रसन्न राहील. आज व्यवसाय करणारे मोठ्या व्यावसायिक डील करू शकतात, ज्याचा त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज सकाळपासूनच चांगली बातमी कळेल, त्यामुळे दिवसभर ते आनंदात राहतील आणि रविवारच्या सुट्टीमुळे घरात मुलांचा किलकिलाट असेल. आज कोणी तुम्हाला चांगलं-वाईट बोललं, तर तुम्हाला त्याचं बोलणं विसरून स्वतःच्या आनंदात आनंदी राहावं लागेल, अन्यथा चिडचिड होईल. व्यवसाय, गुंतवणूक आणि पैशाशी संबंधित कोणतंही काम तुम्हाला आज नफा देईल आणि जमीन आणि वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा देखील सूर्यदेवाच्या कृपेने पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील लहान मुलांसोबत संध्याकाळ मजेत घालवाल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. आज अडकलेले पैसे मिळतील. तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. जर लव्ह लाइफमधील लोकांनी अद्याप जोडीदाराबद्दल घरी सांगितलं नसेल तर ते त्यांना आज भेटवू शकतात, जेणेकरून तुमच्या नात्याला कुटुंबाकडून मान्यता मिळू शकेल. व्यवसाय करणाऱ्यांना आज रविवारच्या सुट्टीचा लाभ मिळेल, दिवसभर व्यावसायिक कामात व्यस्त राहतील आणि विक्रीही चांगली होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: