(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology News : तुमच्या दातांवरही असते राहु-केतुची वक्र दृष्टी; ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या तुमच्या टूथब्रशचा परफेक्ट रंग
Astrology News : जर तुमच्या कुंडलीत द्वितीय चरणात राहु, केतु आणि मंगळ यांसारखे क्रूर ग्रह असतील तर तुम्हाला दातांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Astrology News : सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी जितकं रुप, रंग आणि शारीरिक आकार महत्त्वाचा आहे दिसणं जितकं गरजेचं आहे तितकंच आपल्या दातांना (Teeth) देखील महत्त्व देण्यात आलं आहे. जर आपले दात सुंदर दिसले नाहीत तर त्याचा आपल्या सौंदर्यावर देखील तितकाच परिणाम होतो.
अनेकदा आपण पाहिलं असेल की, दातांची जास्त काळजी घेऊनही दात दुखणे, कॅव्हिटी, दात किडणे, सूजणे यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याचा जितका संबंध तुमच्या निष्काळजीपणामुळे होतो तितकाच तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या दोषामुळे देखील होतो.
जर तुमच्या कुंडलीत द्वितीय चरणात राहु, केतु आणि मंगळ यांसारखे क्रूर ग्रह असतील तर तुम्हाला दातांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच,जर तुमच्या कुंडलीत सूर्य ग्रह मजबूत असेल तर तुमचे दात स्वच्छ दिसतात.
दातांची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचा टूथब्रश. ग्रहांच्या स्थितीनुसार, योग्य रंगाचा टूथब्रश वापरल्याने तुमचे दात तंदुरुस्त होऊ शकतात. चला तर राशीनुसार कोणी कोणत्या रंगाचा टूथब्रश वापरावा हे जाणून घेऊयात.
मेष रास - या राशीच्या लोकांनी सिल्व्हर रंगाचा आणि प्राईम क्वालिटीचाच ब्रश वापरावा. तसेच, हिरव्या किंवा लाल रंगाच्या कलर कॉम्बिनेशनचा वापर अजिबात करू नका.
वृषभ रास - वृषभ राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाच्या ब्रशचा वापर करावा. तर, पिवळ्या आणि सिल्व्हर कलरच्या टूथब्रशचा वापर करू नये.
मिथुन रास - मिथुन राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाच्या ब्रशचा वापर करावा. या लोकांनी लाल किंवा निळ्या रंगाचा ब्रश वापरणं टाळावं.
कर्क रास - क्रीम, गुलाबी आणि हलक्या नारिंगी रंगाचा ब्रश तुमच्या दातांसाठी फार चांगला ठरेल. तर, काळा, निळा रंगाचा ब्रश तुमच्या दातांसाठी चांगला नाही.
सिंह रास - सिंह राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाच्या ब्रशचा वापर करावा. तर, काळा आणि पिवळ्या रंगाच्या ब्रशचा वापर करू नका.
कन्या रास - या राशीच्या लोकांनी चांगल्या क्वालिटीचा ब्रश वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे सिल्व्हर रंगाचाच ब्रश वापरता येईल असा प्रयत्न करा. तर, निळ्या आणि लाल रंगाचा टूथब्रश वापरू नका.
तूळ रास - तूळ राशीच्या लोकांनी लाल रंगाच्या टूथब्रशचा वापर करा. पिवळा आणि सिल्व्हर रंग तुमच्या दातांसाठी योग्य नाही.
वृश्चिक रास - या राशीच्या लोकांनी हलका पिवळा किंवा मस्टर्ड कलरच्या टूथब्रशच्या कलरचा वापर करावा. तर, लाल आणि हिरव्या रंगाचा ब्रश वापरू नका.
धनु रास - काळ्या आणि निळ्या रंगाच्या ब्रशचा प्रयोग तुमच्या दातांसाठी चांगला ठरेल. तर, सिल्व्हर किंवा पांढऱ्या रंगाचा ब्रश तुमच्या दातांसाठी योग्य नाही.
मकर रास - मकर राशीच्या लोकांनी हलका निळा किंवा काळ्या रंगाच्या ब्रशचा वापर करावा. नारिंगी किंवा हिरवा रंगाचा ब्रश वापरणं टाळा.
कुंभ रास - या राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाच्या टूथब्रशचा वापर करावा. मात्र, पांढरा आणि हिरवा रंग तुमच्या दातांसाठी योग्य नाही.
मीन रास - मीन राशीच्या लोकांनी लाल रंगाच्या टूथब्रशने आपल्या दातांची काळजी घ्यावी. क्रीम किंवा सिल्व्हर रंगाचा टूथब्रश वापरू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :