Guru Gochar : 2025 'या' राशींच्या लोकांसाठी ठरणार लकी; गुरुच्या संक्रमणाने जुळून आला 'कुबेर राजयोग'
Guru Gochar Effect 2024 : मे 2024 मध्ये गुरु ग्रहाने मेष राशीतून निघून वृषभ राशीत संक्रमण केलं आहे. गुरु ग्रह मे 2025 पर्यंत याच राशीत विराजमान असणार आहे.
Guru Gochar Effect 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, एखाद्या ग्रहाचं संक्रमणाचा सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम होतो. प्रत्येक ग्रह ठराविक काळाने एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. गुरु ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी 13 महिन्यांचा कालावधी लागतो. गुरु ग्रहाला सुख-समृद्धी, धन-वैभव आणि मान-सन्मानाचा कारक ग्रह मानला जातो.
मे 2024 मध्ये गुरु ग्रहाने मेष राशीतून निघून वृषभ राशीत संक्रमण केलं आहे. गुरु ग्रह मे 2025 पर्यंत याच राशीत विराजमान असणार आहे. गुरु ग्रहाचं वृषभ राशीत संक्रमणाने कुबेर राजयोग जुळून आला आहे. अशातच या शुभ राजयोगाचा विशेष लाभ 3 मुख्य राशीच्या लोकांना होणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
गुरु ग्रहाच्या संक्रमणाने कुबेर योग जुळून येणार आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लकी ठरणार आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. नोकरदार वर्गाला चांगली पगारवाढ मिळेल. या काळात तुमचं प्रमोशन देखील होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मे 2025 पर्यंत गुरुचा आशीर्वाद मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ होईल. अचानक धनलाभ झाल्याने तुम्हाला आनंद होईल. इतकंच नाही तर, समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
गुरुच्या संक्रमणाने कुबेर योग निर्माण झाला याचा लाभ सिंह राशीच्या लोकांना होणार आहे. या दरम्यान नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, परदेशात जाण्याची संधी मिळेल. या काळात व्यापारी वर्गातील लोकांना मोठी डील मिळू शकते. या काळात तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होईल. तुमच्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन देखील मिळू शकतं.
कर्क रास (Cancer Horoscope)
कुबेर राजयोगाची निर्मिती झाल्यामुळे कर्क राशीच्या लोकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल घडतील. जे तरूण स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना चांगलं यश मिळेल. व्यापारी वर्गातील लोक या काळात व्यवसायासंबंधित नवीन योजना आखू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :