Vinayak Chaturthi 2022: मार्गशीर्ष महिन्याची 'विनायक चतुर्थी' गणेश भक्तांसाठी खास! चुकूनही करू नका 'या' चूका
Margashirsh Vinayak Chaturthi 2022: विनायक चतुर्थीच्या दिवशी ही गोष्ट चुकूनही करू नये, कोणती आहे ती गोष्ट? जाणून घ्या चतुर्थीची शुभ वेळ, तारीख आणि महत्त्व
Margashirsh Vinayak Chaturthi 2022 : हिंदू पंचागानुसार, चतुर्थी तिथी प्रत्येक महिन्यात दोनदा येते. कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी म्हणजेच 27 नोव्हेंबरला चतुर्थी येत आहे. पंचांगानुसार मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्याबरोबरच उपवास ठेवला जातो. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात, असा विश्वास आहे. मात्र मार्गशीर्षच्या याच विनायक चतुर्थीच्या दिवशी ही गोष्ट चुकूनही करू नये, कोणती आहे ती गोष्ट? जाणून घ्या चतुर्थीची शुभ वेळ, तारीख आणि महत्त्व
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी 2022 तारीख आणि शुभ मुहूर्त
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सुरू होते - 26 नोव्हेंबर, शनिवार संध्याकाळी 07.28 वाजता
चतुर्थी समाप्ती - 27 नोव्हेंबर, रविवारी दुपारी 04.25 वाजता
दिनांक - विनायक चतुर्थी व्रत 27 नोव्हेंबर रोजी उदया तिथीनुसार करण्यात येईल
अभिजीत मुहूर्त - सकाळी 11.35 ते दुपारी 12.17 पर्यंत
सर्वार्थ सिद्धी योग - 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.38 ते 6.41 वा.
रवि योग - 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 06.53 ते दुपारी 12.38 पर्यंत
विनायक चतुर्थी 2022 चे महत्व
विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याचा पद्धत आहे. या दिवशी गणेशजींचे मंत्र, जप, चालीसा, अनुष्ठान इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. यासोबतच सुख-समृद्धी प्राप्त होते. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
विनायक चतुर्थीच्या दिवशी 'हे' करू नका
हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत केले जाते. रिद्धी-सिद्धी देणाऱ्या श्रीगणेशाच्या उपासनेचा हा दिवस. विनायक चतुर्थीला जो श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा करतो, त्याच्या सर्व समस्या दूर होतात, अशी श्रद्धा आहे. यासोबतच संपत्ती, वैभव आणि बुद्धिमत्तेतही वाढ होते. विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करण्यास मनाई आहे. मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी व्रत 27 नोव्हेंबर 2022 रोजी पाळण्यात येईल. जाणून घ्या, विनायक चतुर्थीच्या पूजेची वेळ आणि या दिवशी चंद्रदर्शन का करू नये.
विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये?
पौराणिक कथेनुसार चंद्रदेवांना आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता. गणपतीला हत्तीचे तोंड लावले जात असताना चंद्रदेव त्याची चेष्टा करत होते. गणपतीने चंद्राला हसताना पाहिले आणि त्यांना राग आला. रागाच्या भरात गजाननाने चंद्राला शाप दिला की, आजपासून तू काळा होशील. तो दिवस विनायक चतुर्थी होता. नंतर चंद्राने या चुकीबद्दल माफी मागितली, तेव्हा गणेशजी म्हणाले की, सूर्याचा प्रकाश मिळाल्यानंतर, आपण हळूहळू आपल्या मूळ रूपात परत याल, परंतु हा दिवस तुम्हाला शिक्षा करण्यासाठी स्मरणात राहील आणि जो व्यक्ती या दिवशी चंद्र पाहेल. त्याला शिक्षा होईल. खोट्या आरोपाचा कलंक लागेल. त्यामुळेच विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन करू आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाने विनायक चतुर्थीचा चंद्र पाहिला होता, त्यानंतर त्यांच्यावर रत्न चोरल्याचा खोटा आरोप लावण्यात आला होता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या