Astrology : तुमच्या स्वप्नात 'ती' तर येत नाही ना? जर येत असेल, तर समजा...
Dream Interpretation : प्रत्येक स्वप्न हे आपल्याला कसले ना कसले संकेत देत असतं. काही स्वप्न ही शुभ असतात तर काही अशुभ. मग आता गर्लफ्रेंड स्वप्नात येत असेल तर त्याचा अर्थ नेमका काय? जाणून घ्या.

Dream Interpretation : आपल्यापैकी प्रत्येक जण साखरझोपेत असला की त्याला स्वप्न ही पडतातच. प्रत्येक स्वप्न हे कोणत्या न कोणत्या गोष्टीचे संकेत देत असते. आपल्या जीवनात स्वप्नांना महत्त्वाचं स्थान आहे. स्वप्नं आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांबद्दल सांगतात. प्रत्येकाला नेहमी वेगवेगळी स्वप्नं पडतात. प्रत्येक स्वप्नात वेगळी माणसं, वेगळ्या जागा, वेगळ्या घटना घडत असतात. प्रत्येक स्वप्न हे आपल्याला काही ना काही संकेत देत असते, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
बऱ्याचदा आपल्याला स्वप्नात आपली प्रेयसी किंवा प्रियकर दिसतो. आता गर्लफ्रेंडचं स्वप्न पडत असेल तर याचा नेमका अर्थ काय? ही स्वप्नं शुभ संकेत देतात की अशुभ? जाणून घेऊया.
स्वप्नात गर्लफ्रेंड दिसली तर समजा...
जर तुम्हाला झोपेत तुमच्या प्रेयसीचं (Girlfriend) स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तुम्ही आनंदाचे क्षण घालवत असाल तर हे एक चांगलं लक्षण आहे. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाची लहर येणार आहे. तसेच तुम्ही जीवनातील चांगले क्षण एकमेकांसोबत घालवाल. शिवाय तुमचं लव्ह लाईफ खूप चांगलं सुरू होणार आहे. स्वप्नात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खूप बोलत असाल तर याचा अर्थ तुम्हाला जीवनात लवकरच चांगली बातमी मिळणार आहे.
स्वप्नात एक्स गर्लफ्रेंडचं दिसणं म्हणजे...
जर तुम्हाला स्वप्नात तुमची जुनी प्रेयसी (Ex-Girlfriend) दिसली तर याचा अर्थ असा आहे की, तुम्ही दोघे लवकरच भेटणार आहात. तुमच्या दोघांची लवकरच भेट होणार आहे.
स्वप्नात प्रेयसी लाल रंगाच्या लग्नाच्या जोड्यात दिसली तर...
जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात प्रेयसी लाल रंगच्या लग्नाच्या जोड्यात दिसली तर याचा अर्थ असा आहे की, तुमच्या दोघांचं लवकरच लग्न होणार आहे. किंवा तुमच्या दोघांचं लग्न होण्याची शक्यता वाढेल. तसेच प्रेयसीचं रंगाच्या लग्नाच्या जोड्यात दिसणं हे तुम्हाला प्रेमात यश मिळणार असल्याचं लक्षण आहे. हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ संकेत आहे.
तुमच्या प्रेयसीला तुमच्या स्वप्नात रडताना पाहणं
जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात प्रेयसी रडताना दिसली तर याचा अर्थ असा की, तुमचा कठीण काळ लवकरच सुरू होणार आहे. तुमचा तुमच्या प्रेयसीशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो, जो तुमच्या नात्यासाठी चांगला नाही. स्वप्नात प्रेयसीचं रडणं अशुभ मानलं जातं. स्वप्नात प्रेयसीचं रडणं म्हणजे दु:खाची सुरुवात असते.
स्वप्नात प्रेयसीशी भांडण होणं
जर तुम्ही स्वप्नात तुमच्या प्रेयसीशी भांडला असाल तर हे अशुभ संकेत देते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. भविष्यात तुमचे तुमच्या प्रेयसीसोबत वाद होऊ शकतात, ज्याचा घोर परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
