![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Remedy Of Burnt Diya Batti: दिवा विझल्यानंतर वाती फेकताय तर थांबा! अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल
Remedy Of Burnt Diya Batti: हिंदू धर्मशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. आपल्यापैकी बरेच जण दिवा लावल्यावर जळलेली वात फेकून देतात. त्या वातीचे काय करावे? या विषयी जाणून घेणार आहे.
![Remedy Of Burnt Diya Batti: दिवा विझल्यानंतर वाती फेकताय तर थांबा! अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल Astro tips Remedy For Burnt Diya Baati don't throw know what to do Marathi News Remedy Of Burnt Diya Batti: दिवा विझल्यानंतर वाती फेकताय तर थांबा! अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/17/fee3f5234bd6f9b2997fe7cfcdf31359171066614210589_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Remedy Of Burnt Diya Batti: हिंदू संस्कृतीत दीप प्रज्वलन हे अतिशय शुभ मानले जाते. देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. अंधार कितीही गडद असला, तरी एक पणती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. प्रत्येकाची घरी दिवा लावला जातो पण तुम्हाला माहीत आहे का दिवा विझल्यानंतर त्याची जी वात जी राहते त्याचे हिंदू धर्मशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. आपल्यापैकी बरेच जण दिवा लावल्यावर जळलेली वात फेकून देतात. त्या वातीचे काय करावे? या विषयी जाणून घेणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार दिवा विझल्यानंतर त्याची पेटलेली वात कधीही इकडे-तिकडे टाकू नये. वास्तविक असे केल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उरलेल्या दिव्याच्या वात पुन्हा लावावी का? असे अनेक प्रश्न पडतात. दिवा लावणे हे जीवनात प्रकाश येण्याचे सूचक मानले जाते. शास्त्रानुसार दिवा लावल्याने कोणत्याही ठिकाणचा अंधार तर दूर होतोच पण तो जीवनात पसरलेल्या अंधाराचा नाश करणाराही मानला जातो. दिवा लावताना जितके फायदे आणि सकारात्मक (Positive) परिणाम मानले जातात तितकेच नकारात्मक (Negative) परिणाम दिवा विझवतानाही विचारात घेतले जातात.
जळालेल्या वातीचे काय करावे?
- शिल्लक राहिलेली वात पुन्हा वापरु नये. दिवा स्वच्छ धुवून दुसरी वात लावावी. पुन्हा तीच वापरू नये.
- ज्योतिष शास्त्रानुसार पुजेनंतर दिव्यात वात उरली असेल तर ती कपड्यात बांधून ठेवावी.
- सर्व गोळा झाल्यावर हे कापड बांधून निर्माल्य कलशात टाकावे.
- रिकाम्या जागेत एखादा छोटा खोदून पुरावे.
- दिव्याची वात कोणाच्या पायाखाली येणार नाही
- नदी, नाल्यात फेकू नये.
- जळलेल्या प्रकाशामुळे ग्रह दोष दूर होतात
- ज्योतिष शास्त्रामध्ये दिवा लावण्याचा हा विशेष उपाय ग्रह दोष दूर करण्यात मदत करतो.
- उरलेली जळलेली वात कधीही कचऱ्यात टाकू नका.
- नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानावेळी चोवीस तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प केला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Holi 2024 Vastu Tips: होळीच्या आधी घरी अवश्य आणा 'या' चार वस्तू; आयुष्यभराची दरिद्री जाईल,वास्तू समस्या संपतील अखंड लक्ष्मी नांदेल!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)