एक्स्प्लोर

नोकऱ्यांच्या बाबतीत 2023 हे वर्ष खूपच वाईट, IT क्षेत्राला सर्वाधिक फटका 

नोकऱ्यांच्या बाबतीत 2023 हे वर्ष खूपच वाईट गेलं आहे. IT क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे.  

jobs : कोरोनाच्या काळानंतर भारताची अर्थव्यवस्था यावर्षी चांगल्या स्थितीत दिसली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठा विश्वास व्यक्त केला असून, त्याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. तो सध्या त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या आसपास व्यवहार करत आहे. यावर्षी अनेक कंपन्यांनी चांगला नफा करुनही त्यांनी लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे. छोट्या कंपन्यांपासून ते मोठ्या टेक दिग्गजांनीही या शर्यतीत भाग घेतला. याचा सर्वाधिक परिणाम आयटी क्षेत्रावर दिसून आला. तेथे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरीच्या दृष्टीकोनातून हे वर्ष खूप वाईट गेले आहे. 

मोठ्या कपंन्यानी देखील कर्मचाऱ्यांनी काढले

हे वर्ष भारत आणि तेथील नागरिकांसाठी अनेक आघाड्यांवर चांगले सिद्ध झाले आहे. सध्या सुरू असलेल्या जागतिक मंदीच्या काळात या देशाच्या विकासात कोणतीही घट झाली नसली तरी त्याचा परिणाम रोजगार क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. जगातील छोट्या कंपन्यांपासून ते Google-Microsoft सारख्या मोठ्या टेक दिग्गजांनीही लोकांना त्यांच्या कार्यालयातून काढण्याचे आदेश दिले आहेत. 

लाखो नोकऱ्या गेल्या

वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे. अनेक कंपन्या अजूनही टाळेबंदीच्या प्रक्रियेवर काम करत आहेत. म्युझिक स्ट्रीमिंग ऍप्लिकेशन स्पॉटिफायने या महिन्याच्या सुरुवातीला 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हे कंपनीच्या एकूण कार्यबलाच्या 17 टक्के आहे. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार 2023 मध्ये 2,40,000 पेक्षा जास्त नोकऱ्या कमी झाल्या आहेत, जे 2022 पासून 50 टक्क्यांनी वाढले आहे. या वर्षी, मायक्रोसॉफ्ट, मेटा, गुगल, अॅमेझॉन आणि झूम सारख्या इतर काही मोठ्या टेक कंपन्या होत्या ज्यांनी टाळेबंदी केली आहे.

Layoffs.fyi अहवालानुसार, एकट्या 2022 मध्ये, 1,64,969 पेक्षा जास्त तंत्रज्ञान कामगारांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या, जे 2020 मध्ये 80,000 आणि 2021 मध्ये 15,000 वरून लक्षणीय उडी आहे. केवळ नोव्हेंबर 2023 मध्ये, 64 टेक कंपन्यांनी 7,026 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले, जे टेक लेऑफमध्ये वाढ दर्शवते. बहुतेक कंपन्यांनी त्यांच्या निर्णयाचे श्रेय कंपनी पुनर्रचना आणि खर्च कपातीला दिले आहे. काही तज्ञांचा असा विश्वास आहे की तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्या गमावण्याचे एक प्रमुख कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचे आगमन आहे. विशेष म्हणजे या एआयने ज्याने ते तयार केले आहे त्याचे काम हिरावून घेतले आहे. ChatGPT च्या सीईओचीही नोकरी गेली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की मायक्रोसॉफ्टची AI कंपनी ChatGPT आहे. Google ने AI प्लॅटफॉर्म बोर्ड देखील तयार केला आहे.

स्टार्टअपची स्थिती बिकट

2022 मध्ये फंडिंग हिवाळा सुरू झाल्यापासून 121 भारतीय स्टार्टअप्सद्वारे सुमारे 34,785 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. INC 42 च्या अहवालानुसार, 24 भारतीय एडटेक स्टार्टअप्स, ज्यात टॉप 7 एडटेक युनिकॉर्नपैकी 6 आहेत, त्यांनी गेल्या वर्षापासून 14,616 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. या वर्षी आतापर्यंत 69 स्टार्टअप्सनी 15,247 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, यावरून असे दिसून येते की, नोकऱ्या कपातीच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

बायजूसारख्या कंपनीत काढले कामगार

भारतात स्टार्टअप इंडियाचा उदय झाला आहे. याचा फायदाही अनेक कंपन्यांना झाला आहे. कोरोनाच्या काळात बायजूने ज्या वेगाने वाढ नोंदवली. आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. Byju रोख प्रवाहाशी संघर्ष करत आहे. कंपनीने कर्मचारी काढून टाकण्यापासून नवीन निधी उभारण्यापर्यंत सर्व काही प्रयत्न केले आहेत. ब्लूमबर्गने सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, स्टार्टअप कंपनी बायजू, जी रोखीच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहे, त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे कंपनीच्या संस्थापकाने केवळ आपली मालमत्ताच नाही तर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेली मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे करण्याचा मार्ग शोधला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget