Agriculture News : राज्यात तुरीचा हंगाम धोक्यात? तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
राज्यात खरीप तुरीचा (Tur) हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सध्या तुरीवर मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे
Agriculture News : राज्यात खरीप तुरीचा (Tur) हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सध्या तुरीवर मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे. राज्यातील विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील तूर उत्पादक पट्ट्यामध्ये जवळपास दोन ते तीन लाख हेक्टरवरील तुरीचे पीक या किडीच्या प्रादुर्भावामुळं सध्या बाधित झालं आहे. मात्र, याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचा सल्ला अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth) दिला आहे.
सध्या राज्यातील तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण तुरीवर मोठ्या प्रमाणावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. मोठ्या क्षेत्रावरील तुरीचं पीक या किडीच्या प्रादुर्भावामुळं बाधित झालं आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर तुरीचं क्षेत्र आहे. आत्तापर्यंत दोन ते तीन लाख हेक्टरवरील क्षेत्र या अळीच्या प्रादुर्भावामुळं बाधित झालं आहे. आणकी क्षेत्र बाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं राज्यातील तूर उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फटका
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक हे सोयाबीन आहे. त्यानंतर प्रमुख पीक म्हणून तुरीकडे बघितलं जातं. आधीच अतिवृष्टीमुळं सोयाबीन आणि कापूस पिकाच मोठं नुकसान झालं आहे. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यातून उरली सुरली पीकसुद्धा आता वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा जोर वाढल्यामुळं तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे बोलले जात आहे. शेंगा पोखणाऱ्या अळीमध्ये तीन प्रकारच्या अळी असतात, यामध्ये शेंगा पोखरणारी अळी, पिसाळी पतंग आणि शेंग अळी या तिन प्राकराच्या किडीचा प्रादुर्भाव मराठवाडा आणि विदर्भातील तुर पिकावर झाला आहे.
या जिल्ह्यात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
विदर्भाचा विचार केला तर अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. तर मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तुरीवर या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहे. या अळीमुळं तुरीच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. मागील वर्षापेक्षा यंदा जवळपास साडेतीन लाख मेट्रीन टन तुरीच उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यावर्षी 39.5 लाख मेर्टीक टन तुरीचं उत्पादन होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचा सल्ला अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे. तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून पिकाचं कसं संरक्षण करावं यासाठीता सल्लाही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांना दिला आहे. या किडीचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी जैविक आणि रासायनिक खतांच्या फवारण्या आवश्यक आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठनं दिलेल्या सुचनांचे पालन करणं गरजेचं आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या: