Success Story: दुग्ध व्यवसायातून वर्षाला 30 ते 35 लाख उत्पन्न, इंदापुरातील शेतकऱ्याची यशोगाथा
घरच्या गाईपासून त्यांचे जवळपास 300 लिटर दूध निघतं. तर उरलेलं दूध शिंदे दूध केंद्रात येणाऱ्या दुधातून घेतात आणि त्या दूध उत्पादकांना 36 रुपयांचा दर देतात.
पुणे : सध्या दुधाचे दर कमी झाल्याने दूध (Milk) उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.मात्र इंदापूर तालुक्यातील सराफवाडी येथील दूध उत्पादक शेतकरी स्वप्नील शिंदे, जे दुधाची विक्री न करता त्या दुधावर प्रोसेस करतात. त्यातून त्यांना चांगला फायदा होतो. वर्षाकाठी त्यांना निव्वळ नफा 30 ते 35 लाख रुपये मिळत आहे.
दूध डेअरीला द्यायला परवडत नाही.म्हणून स्वतःच्या गाईचे दूध डेअरीला न घालता इंदापूर तालुक्यातील सराफवाडी येथील शेतकरी स्वप्नील शिंदे हे दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. त्यातून त्यांना आर्थिक लाभ देखील होतो.शिंदे यांच्याकडे 25 गाई आहेत. शिंदे यांचे दूध संकलन केंद्र देखील आहे. रोज शिंदे हे 600 लिटत दुधाचा खावा बनवतात. घरच्या गाईपासून त्यांचे जवळपास 300 लिटर दूध निघतं. तर उरलेलं दूध शिंदे दूध केंद्रात येणाऱ्या दुधातून घेतात आणि त्या दूध उत्पादकांना 36 रुपयांचा दर देतात.
वर्षाकाठी निव्वळ नफा 30 ते 35 लाख रुपये
गाईंच्या चारा शिंदे आपल्या घरच्या 15 एकरांवर लावतात. तसेच घरातील पाच व्यक्ती या कामात त्यांना मदत करतात. शिंदे हे फक्त खावा न बनवता पेढा, पनीर, सिझनला कुल्फी बनवतात. व त्याची विक्री सोलापूर, पुणे नगरला विकतात. दूध जर डेअरीला घातले असते तर दुधाला 34 रुपयांचा दर मिळाला असता परंतु दुधावर प्रोसेस केल्याने त्यांच्या दुधाला 40 ते 42 रुपयांचा मिळतो. वर्षाकाठी त्यांना निव्वळ नफा 30 ते 35 लाख रुपये मिळतो. खावा 230 ते 250 किलोप्रमाणे विकतात.
दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत
दुग्ध व्यवसाय परवडत नसल्याचे अनेक दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची तक्रार असते. पशु खाद्याच्या किंमती वाढल्या आहेत तर दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु दुधावर प्रोसेस करून विकले तर आर्थिक लाभ होतो हे शिंदे यांच्या उदाहरणातून दिसून आलं आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी वेगळा विचार करायला हरकत नाही.
रिव्हर्स रेट वाढवण्यात आल्याने दूध व्यवसाय तोट्यात
शेतकऱ्यांना दूध संघांनी आणि दूध कंपन्यांनी गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा यासाठी शासन आदेश काढण्यापूर्वी फॅटचा रिव्हर्स रेट प्रति कमी होणाऱ्या 1 पॅाइंटसाठी 20 पैसे होता. आता तो सरळ 50 पैसे करण्यात आला आहे. एस.एन.एफ.चा रिव्हर्स रेट प्रति कमी होणाऱ्या 1 पॅाइंटसाठी 30 पैसे होता, आता तो 1 रुपया करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना यामुळे फक्त 25 ते 30 रुपयांचा दर मिळत आहेत.
हे ही वाचा :