एक्स्प्लोर

Raju Shetti : इथेनॅालच्या दरात पाच रूपयांची वाढ करावी, राजू शेट्टींची केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिवांकडे मागणी           

इथेनॅालच्या दरामध्ये (Ethanol Rate) प्रति लिटर पाच रुपयांची वाढ करावी अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे.

Raju Shetti : ब्राझीलमध्ये (Brazil) गेल्या दोन वर्षात साखरेचं उत्पादन (Sugar production) घटलं आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेला चांगला दर मिळत आहे. मात्र, भविष्यातील आंतरराष्ट्रीय बाजारातील ब्राझीलमध्ये वाढणाऱ्या साखर उत्पादनाचा विचार करता देशातील साखरेच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं इथेनॅालच्या दरामध्ये (Ethanol Rate) प्रति लिटर पाच रुपयांची वाढ करावी अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन (Pankaj Jain) यांच्याकडे केली आहे. राजू शेट्टी यांनी दिल्लीत पंकज जैन यांची भेट घेतली.

देशात दिवसेंदिवस ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या दोन वर्षापासून देशात जवळपास 350 लाख टनाहून अधिक  साखरेचं विक्रमी उत्पादन होऊ लागले आहे. तर देशातंर्गत बाजारपेठेत 260 ते 270 लाख टन साखरेचा खप आहे. यामुळं भविष्यात ब्राझील व इतर देशात विक्रमी साखर उत्पादन झाल्यास भारतीय साखर उद्योगावर मोठे संकट निर्माण होणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. सध्या केंद्र सरकारनं ऊसाच्या रसापासून इथेनॅाल करण्यास परवानगी दिल्यानं पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॅाल मिसळले जावू लागले आहे. यामुळं गतवर्षी केंद्र सरकारचा जवळपास 53 हजार कोटी रूपयांचे परकीय चलन वाचले आहे. ऊसापासून सी हेव्ही , बी हेव्ही व  थेट रसापासून देशामध्ये गेल्यावर्षी 825 कोटी लिटर इथेनॅाल निर्मीती केली गेल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

शेती क्षेत्रातील डिजीटल तंत्रज्ञानाबाबत देश  पिछाडीवर 

देशातील शेतकऱ्यांनी ऊसाचे पिक हे खात्रीशीर पैसे मिळणारे पिक आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस पिकाकडे वळू लागले आहेत. यामुळं केंद्र सरकारनेही या उद्योगातून सरकारला मिळणारा सर्वाधिक महसूल व पेट्रोल खरेदी मधून  वाचणारे परकीय चलन या सर्व गोष्टींचा विचार करून इथेनॅाल खरेदी दरात पाच रूपयांची वाढ करण्याची मागणी राजू शेट्टींनी  केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांच्याकडे केली आहे. दरम्यान, नवी दिल्लीत भारतीय कृषक समाज यांच्या वतीनं भारतीय शेतीतील डिजीटाईलायझेशनमुळे होणारे फायदे व तोटे , शेती क्षेत्राच्या डिजीटल धोरणामध्ये आवश्यक असेलेले बदल याबाबत देशातील शेतकरी नेते व तज्ज्ञांची परिषद घेण्यात आली. या परिषदेत देखील शेट्टी सहभागी झाले होते. देशपातळीवर आज डिजीटल इंडियाचा बोलबाला सुरू आहे. पण शेती क्षेत्रातील डिजीटल तंत्रज्ञानाबाबत अजूनही देश पिछाडीवर आहे. यामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू लागल्याचे शेट्टी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Raju Shetti : 100 खोके देऊन सुद्धा सरकार येऊ देणार नाही! 25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन; राजू शेट्टींचा एल्गार

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
Embed widget