Pradhan Mantri Fasal Bima Yojana : फक्त एक रुपयात पीक विमा आजच करून घ्या; 'या' पिकांसाठी विमा संरक्षण
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : या वर्षी सुद्धा एक रुपयात पिक विमा मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा करावा, असं आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : धकाधकीच्या आयुष्यात आरोग्य विमा गरजेचा झाला आहे, अगदी त्याच पद्धतीने पीक विमा सुद्धा (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) अत्यावश्यक झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी शेतात ओलावा झाल्याने पेरणी करून घेतली आहे. मात्र, मान्सून सुरु झाल्यानंतर अजून अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे पीके पुन्हा पुन्हा संकटात सापडली आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात अपेक्षित पाऊस झाला नसल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत राज्यात खरीप पिकांसाठी विमा भरण्याची सुरुवात झाली आहे.
सरकारच्या अधिकृत पोर्टलवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या वर्षी सुद्धा एक रुपयात पिक विमा मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा करावा, असं आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
कोणत्या पिकांसाठी पिक विमा करता येईल?
खरीप 2024 साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारले, कांदा ही 14 पिके पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला विमा भरून घ्यावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.
अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी?
- अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे.
- पीक विम्याचा अर्ज आधारवरील नावाप्रमाणेच असावा
- पीक विम्यातील नुकसान भरपाई केंद्र शासनाचे विमा पोर्टल द्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते.
- त्यामुळे बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे.
- यासाठी आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात
- आधार कार्डवरील नाव बँक खात्यावरील नावासारखे असावे.
- शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपया रुपयाप्रमाणे सीएससी चालकांना द्यावेत
योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा कराल?
- सुरुवातीला पीक विमा सर्च केल्यानंतर https://pmfby.gov.in/ ही वेबसाईट प्रथम दिसून येईल.
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वेबसाईट ओपन झाल्यानंतर फार्मर अॅप्लिकेशन पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर गेस्ट फार्मर या पर्यायावर क्लिक करा
- नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करून सर्व माहिती भरा
मोबाईल क्रमांक टाकून व्हेरिफाय करा
- स्क्रीनवर एक कॅपचा कोड दाखवला जाईल, तो टाकून गेट ओटीपी क्लिक करावं लागेल.
- सुरुवातीला बँक पासबुक फोटो अपलोड करा
- डिजिटल सहीचा सातबारा उतारा आणि आठ अ उतारा एकाच पीडीएफ फाईलमध्ये अपलोड करा
दरम्यान, या योजनेमध्ये सामील होण्यासाठी आपण जे पीक घेतलं आहे त्याचाच विमा घ्यायचा आहे. शेतात विमा घेतलेलं पीक घेतलं नसल्यास पिक विमा मिळणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या