PM Kisan : कधी मिळणार PM Kisan चा 13 वा हप्ता? 'या' महिन्यात हप्ता जमा होण्याची शक्यता, वाचा सविस्तर...
PM किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 13 वा हप्ता कधी मिळणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
PM Kisan Samman Nidhi : PM किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 13 वा हप्ता कधी मिळणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हप्ते जमा झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये (February) हा हप्ता मिळणार आहे. PM किसान योजनेचा 13 वा हप्ता जानेवारी (January) महिन्यात मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे. 12वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचण्यास एक ते दीड महिन्यांचा उशीर झाला होता.
फेब्रुवारीमध्ये 13वा हप्ता जमा होण्याची शक्यता
मागील वर्षी केंद्र सरकारनं 1 जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचा हप्ता शेतकऱ्यांना दिला होता. त्यामुळं यावर्षी देखील 1 जानेवारी किंवा 26 जानेवारीला 13 वा हप्ता जमा होईल अशी चर्चा होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा झालेला नाही. आता जानेवारी महिना जवळपास संपत आला आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून PM किसान योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मिळेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करू शकते. मात्र, केंद्र सरकारकडून हप्ता देण्याबाबतचे अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.
12 हप्ता मिळण्यासही विलंब
12 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यास बराच विलंब झाला होता. 12 वा हप्ता जारी करताना केंद्र सरकार अपात्रांची वर्गवारी करण्यात गुंतले होते. कोणत्याही अपात्र व्यक्तीच्या खात्यात पैसे पोहोचू नये, असा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. या कारणामुळं सुमारे 2 कोटी शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात आले होते. यात असे अनेक लोक असले तरी जे पात्र होते. मात्र ई-केवायसीमुळे हप्ता मिळू शकला नाही. आता केंद्र सरकार 12 वा हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील तो हप्ता देणार आहे.
'या' शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून अनेक अपात्र शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. सध्या ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. कारण अद्याप काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदणीची पडताळणी पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळू शकले नाहीत. मात्र आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पडताळणी करून घेतली आहे. तसेच ई-केवायसी पूर्ण केली आहे. त्यामुळं त्यांना आता फक्त 13 व्या हप्त्याचे 2 हजार रुपयेच मिळणार नाहीत. तर त्यांना 12 आणि 13 व्या हप्त्याचे मिळून 4 हजार रुपये मिळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: